अहमदनगर:-दलित अन्याय विरोधात रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या ए गटाने घटनास्थळी जाऊन घेतली पीडितांची भेट.
ज्येष्ठ पत्रकार अजित जगताप सातारा:-9922241299

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
ज्येष्ठ पत्रकार अजित जगताप सातारा
दलित अन्याय विरोधात रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या ए गटाने घटनास्थळी जाऊन घेतली पीडितांची भेट.
अहमदनगर दि: महाराष्ट्राची भूमी ही संतांची आणि विचारवंतांची जरी असली तरी सातारा व अहमदनगर जिल्ह्यात दलितांवर होणाऱ्या अत्याचाराविरोधात रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया ए गटाचे राष्ट्रीय अध्यक्ष दीपक भाऊ निकाळजे व राज्य उपाध्यक्ष दादासाहेब ओव्हाळ व स्थानिक कार्यकर्त्यांनी प्रत्यक्ष घटनास्थळी जाऊन पिडीत मातंग व बौद्ध युवक कुणाल मगर, शुभम मागाडे, ओम गायकवाड, प्रणव खंडागळे या चार मुलांची भेट घेऊन तुमच्या पाठीशी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया ए गट कायम आहे. असा दिलासा दिला.या वेळेला पिडीत कुटुंबाचे अश्रू अनावर झाले.
याबाबत माहिती अशी की, महाराष्ट्राला हादरून टाकणाऱ्या हरेगाव ता. श्रीरामपूर जिल्हा अहमदनगर या ठिकाणी झाडाला बांधून मातंग, बौद्ध समाजाच्या चार मुलांना जातीवाचक शिवीगाळ करून बेदम मारहाण केली होती. तसेच सातारा जिल्ह्यातील पाल वण ता. माण येथे शहीदा महादेव तुपे या महिलेला बेदम मारहाण केली होती. तिला वाचवण्यासाठी कोणी ही पुढे आले नाही.अशा पद्धतीने महाराष्ट्रात जातीयवाद उफाळून आलेले आहे.
त्याबाबत जाब विचारण्यासाठी काल दुपारी तीन वाजता हेरगाव, कामगार रुग्णालय, श्रीरामपूर येथे पीडितांची भेट घेतली.
यावेळी पक्षाचे महाराष्ट्र कार्याध्यक्ष बाळासाहेब पवार, उपाध्यक्ष दादासाहेब ओव्हाळ, संघटक कैलास जोगदंड ,शशिकांत दारुडे, नगर जिल्हाध्यक्ष भाऊसाहेब पगारे राकेश कापसे, सातारा जिल्हा सचिव किरण बगाडे, उपाध्यक्ष सुनील ओव्हाळ, राजेंद्र ओव्हाळ व इतर कार्यकर्त्यांनी रिपब्लिकन पक्षाचे ए गटाचे राष्ट्रीय अध्यक्ष दीपक भाऊ निकाळजे यांनी यापुढे दलितांवर अशा पद्धतीने हल्ले झाले तर त्याला प्रत्युत्तर देण्याची क्षमता पक्षाकडे आहे. या गुन्ह्यांबाबत कोणत्याही प्रकारची पार्सिलिटी न करता सर्व पुरावे ग्राह्य धरून तपास यंत्रणेने मानवता भावनेतून याचा तपास करावा. अशी तपास अधिकाऱ्यांना सूचना केली. दरम्यान या गुन्ह्यामध्ये सर्व पीडितांची वेगवेगळ्या पद्धतीने एफ. आय. आर. लिहून पूर्ण करावी. या पिढीचा उपचाराचा संपूर्ण खर्च रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया ए गट करेल असे त्यांनी स्पष्ट केले.
————————————————
फोटो – श्रीरामपूर कामगार रुग्णालयात पिढीचा ची भेट घेताना रिपब्लिकन नेते दीपक भाऊ निकाळजे व दादासाहेब ओव्हाळ (छाया- अजित जगताप ,अहमदनगर )