ताज्या घडामोडी

सातारा:-ज्येष्ठ नेते शरदचंद्र पवारसाहेबांच्या दौऱ्यातील वाहनाच्या सात क्रमांकान चर्चेला उधाण …..

ज्येष्ठ पत्रकार अजित जगताप सातारा 

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483

 ज्येष्ठ पत्रकार अजित जगताप सातारा

RPS STAR NEWS

ज्येष्ठ नेते शरदचंद्र पवार साहेबांच्या दौऱ्यातील वाहनाच्या सात क्रमांकान चर्चेला उधाण …..

सातारा दि: देशाच्या राजकारणामध्ये अनेक सत्तांतर घडवून आणणारे ज्येष्ठ नेते शरदचंद्र पवार साहेब यांची प्रत्येक कृती ही विविध अँगलमधून दाखवण्याचा प्रयत्न केला जातो. सातारा जिल्ह्याच्या रविवारच्या २२ सप्टेंबरच्या दौऱ्यामध्ये ज्येष्ठ नेते शरदचंद्र पवार साहेबांनी 0007( ट्रिपल झिरो सेवन) या क्रमांकाच्या मर्सिडीज वाहनातून कार्यक्रम स्थळे जाण्यास पसंती दिली. आता त्याची चर्चा होऊ लागलेली आहे.
सातारा जिल्ह्यामध्ये अकरा तालुके व विधानसभा आणि विधान परिषद असे मिळून अकरा आमदार व तीन खासदार आहेत. सातारा जिल्ह्यातील विधानसभा मतदारसंघात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाच्या शिवसेनेमधील पाटणचे शंभूराजे देसाई, कोरेगावचे आमदार महेश शिंदे, भाजपचे माण खटावचे आमदार जयकुमार गोरे, सातारा जावळीचे आ .शिवेंद्रसिंहराजे भोसले, राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा गटाचे वाईचे मकरंद पाटील, फलटणचे दीपक चव्हाण व कराड दक्षिणचे राष्ट्रीय काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण, आणि कराड उत्तरचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे बाळासाहेब पाटील असे आठ आमदार आहेत. तर आमदार बाळासाहेब पाटील हे एकमेव शरद पवार गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार आहेत.
उर्वरित सात हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सुतारी चिन्हावरचे उमेदवार नसल्यामुळे बहुदा वेडात मराठे वीर दौडले सात… आता या सात जणांचे राजकीय भवितव्य आता ज्येष्ठ नेते शरद पवार साहेबांच्या हाती असल्यामुळेच त्यांनी सातारा जिल्ह्यातील दौऱ्यात सात क्रमांकाच्या वाहनाचा वापर केला आहे. हा सात क्रमांक जनतेला दाखवून दिलेला आहे. प्राधान्यक्रम जर लावला तर कोरेगाव, वाई, आणि सातारा- जावळी या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची तुतारी मोठ्या जोमाने व जोशाने फुंकण्याची तयारी सुरू झालेली आहे. श्री पवार साहेबांच्या वाहनाचा क्रमांक हा तीन आहे. याचीही चर्चा होऊ लागलेली आहे. वास्तविक पाहता जगप्रसिद्ध जेम्स बॉण्ड यांच्या झिरो झिरो सेवन या क्रमांकाचे जगभर आकर्षण आहे. साताऱ्यात भाजपचे खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले हे 007 (झिरो झिरो सेवन) व आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले हे 1111 हा क्रमांक वाहनांसाठी आवडीने घेतात. बाकी इतरांकडेही वाहनांचा ताफा असला तरी हे दोन क्रमांक महाराष्ट्रभर प्रसिद्ध आहेत आता ज्येष्ठ नेते शरदचंद्र पवार साहेब यांनी सुद्धा आता जेम्स बॉण्ड सारखे झिरो झिरो सेवन या वाहनातून फेरफटका मारल्यामुळे सातारा जिल्ह्यातील सात आमदार पुन्हा निवडून येतील का? याची आता चर्चा होऊ लागलेली आहे.

ACLS TIMES” YOUTUBE चॅनेल ला LIKE SUBSCRIBE आणि COMMENT करा. 🙏

ACLS इंटरनॅशनल प्रेस रिपोर्टर असोसिएशन

शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button