आरोग्य व शिक्षणताज्या घडामोडीमहाराष्ट्र

गोंदवले:-मनसेच्या वतीने कृषी सहाय्यक पदी निवड झालेल्या सुप्रिया रणपिसे यांचा सत्कार.

ज्येष्ठ पत्रकार अजित जगताप सातारा  

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483

ज्येष्ठ पत्रकार अजित जगताप सातारा

RPS STAR NEWS

मनसेच्या वतीने कृषी सहाय्यक पदी निवड झालेल्या सुप्रिया रणपिसे यांचा सत्कार.

गोंदवले :-परमपूज्य श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या गोंदवले बुद्रुक तालुका माण येथील बौद्ध समाजातील सुप्रिया रणपिसे हिने स्पर्धा परीक्षेत यश मिळवून कृषी सहाय्यक पदी गवसणी घातली आहे. या त्यांच्या कर्तबदारीची नोंद घेऊन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सातारा जिल्हाध्यक्ष व युवा नेते श्री धैर्यशील पाटील यांनी मनसे व ग्रामस्थांच्या वतीने सत्कार केला.

दुष्काळी माण तालुक्यातील गोंदवले बुद्रुक परिसरात गवंडी कामातूनच आपल्या कुटुंब उदारनिर्वाह करणारे राजेंद्र रणपिसे यांची कन्या सुप्रिया रणपिसे यांनी महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात आलेल्या कृषी सहाय्यक परीक्षेमध्ये घवघवीत यश संपादन केले. या त्यांच्या प्रेरणादायक कामगिरीची दखल म्हणून महाराष्ट्र नवनिर्माण सेना मनसेचे जिल्हाध्यक्ष श्री धैर्यशील पाटील यांनी स्वतः श्री रणपिसे यांच्या घरी जाऊन त्यांची कन्या सुप्रिया रणपिसे हिचा मानवतेची शिकवण देणारे तथागत भगवान गौतम बुद्धाची मुर्ती व पेढे तसेच पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. खरोखरच मनसेच्या या सत्काराने खऱ्या अर्थाने मनसे प्रमुख राज ठाकरे साहेब यांच्या विचाराचा वारसा जपणाऱ्या या कार्यकर्त्यांनी सर्वधर्मसमभाव मानून जी भूमिका घेतली. त्याचे सातारा जिल्ह्यात स्वागत केले जात आहे.
गोंदवले बुद्रुक मधील एका लाडक्या बहिणीने गुणवत्ता दाखवून दिलेली आहे. याच गावामध्ये पोलीस दलात अधिकारी असलेल्या प्रेरणा कट्टे पाटील यांच्यानंतर सुप्रिया रणपिसे यांनी शासकीय सेवेत गरुड झेप घेतलेली आहे. त्यांनी कुटुंबाचे नाव मोठे केले असून पुणे विभागात कृषी सहाय्यक पदी त्यांनी गवसणी घातलेली आहे. हे गोंदवले बुद्रुक येथील अनेकांना प्रेरणादायक आहे. अशा शब्दात श्री. पाटील यांनी सुप्रिया रणपिसे यांचा गौरव केलेला आहे. या कार्यक्रमाला मनसे विद्यार्थी जिल्हाप्रमुख सागर कट्टे- पाटील ,ओमकार गुंजवटे, निलेश सोनवणे, नानासाहेब कट्टे पाटील, विश्वराज कट्टे पाटील, चैतन्य अवघडे, वैभव रणपिसे, युवराज अहिवळे, सर्वजित देशमुख यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. माण- खटाव तालुक्यामध्ये मनसेच्या प्रत्येक कार्याची दखल समाज घेत असून भविष्यात मनसे पक्षाकडून खूप मोठ्या अपेक्षा पूर्ण होतील. असे संकेत मिळालेले आहेत.

ACLS TIMES” YOUTUBE चॅनेल ला LIKE SUBSCRIBE आणि COMMENT करा. 🙏

ACLS इंटरनॅशनल प्रेस रिपोर्टर असोसिएशन

शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button