फलटण:-चावी दिलेल्या खेळण्याप्रमाणे लोकप्रतिनिधी फलटण तालुक्याला मिळणे हे दुर्भाग्यच : प्रदीप झणझणे.
पत्रकार अशितोष चव्हाण

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
पत्रकार अशितोष चव्हाण
RPS STAR NEWS
चावी दिलेल्या खेळण्याप्रमाणे लोकप्रतिनिधी फलटण तालुक्याला मिळणे हे दुर्भाग्यच : प्रदीप झणझणे.
फलटण तालुक्यातील सामाजिक व राजकीय क्षेत्रात मागील वीस वर्षांपासून आम्ही कार्यरत आहोत. त्यामुळे इथल्या नागरिकांच्या, शेतकऱ्यांच्या व एकंदरीत जनतेच्या बाबतीत होणाऱ्या गैरसोयींबाबत व अन्यायांबाबत बोलण्याचा नैतिक अधिकार इथल्या प्रत्येक नागरिकास आहे हे कोणीही नाकारू शकत नाही. यामध्ये कोणाचाही अवमान करण्याची इच्छा अजिबात नाही. अन्यायाला वाचा फोडणे हे विरोधकांचे कामच असते. मान-अवमान, सौभाग्य-दुर्भाग्य हे आपल्याच कर्म कर्तुत्वावर ठरले जाते. मतदार जनता ते ठरवत असते. निवडणुकीत निवडून आलेला उमेदवार हा पाचही वर्ष मतदार संघात सातत्याने व प्रामाणिकपणे काम करताना दिसला पाहिजे. केवळ निवडणुकीपुरतं दिसायचे आणि पुन्हा गायब व्हायचं हे जनतेला आता पाठ झालेलं आहे असे फलटण तालुका प्रजा गटाचे प्रमुख प्रदीप झणझणे यांनी सांगितले.
एखादी गोष्ट फलटण तालुक्यातील जनहिताच्या दृष्टीने होणे आवश्यक आहे अशी खात्री झाली की लगेच त्या गोष्टीवरती आम्ही काम सुरू केलेलं आहे. अशी बहुतांश प्रकारची कामे लोक मागणीस्तव आम्ही फलटण तालुक्यात केलेली आहेत व करत आहोत हे कोणीही नाकारू शकत नाही. आम्हाला कधीही एखाद्या समस्येवर लोकमागणी आल्यानंतर जनहितासाठी कोणाच्या परवानगीची आवश्यकता कधी लागली नाही. मी आत्तापर्यंत फलटण तालुका कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीत संचालक पदाची एकमेव निवडणूक माझ्या आयुष्यात लढलेलो आहे. जरी मी कोणत्याही निवडणुकीतून निवडून आलेला लोकप्रतिनिधी नसलो तरी जनतेच्या हितासाठी त्यांनी सांगितलेल्या समस्येवर पाचही वर्ष तन-मन-धन अर्पुन नम्रपणे काम करणारा फलटण तालुक्यातील जनतेचा जनसेवक आहे असं मनापासून व हृदयापासून मानतो. फलटण तालुक्यातील जनतेच्या समस्या सोडवण्यासाठी आम्ही प्रजा गट फलटण तालुका जनसंपर्क कार्यालय उभे करून जनतेच्या समस्या इथे प्रामाणिकपणे व निस्वार्थपणे सोडवत आहोत. फलटण तालुक्यात हे सर्वांना सर्वश्रुत आहे. मला फलटण तालुक्यातील जनतेसाठी व शेतकऱ्यांसाठी काम करण्याची, सेवा करण्याची संधी मिळाली हेच मी माझं सौभाग्य मानतो. माझा जन्म या फलटण तालुक्यात झाला व येथील जनतेला निस्वार्थ सेवा देण्यासाठी हा फलटण तालुका मला मिळाला हेच माझं जन्मोजन्मीचं प्रचंड मोठं सौभाग्य असल्याचं रोखठोक प्रतिपादन फलटण तालुका प्रजा गटाचे प्रमुख प्रदीप झणझणे यांनी केले.
फलटण तालुक्यातील मतदार जनता जेव्हा निवडणुकीत मतदान करत असते, तेव्हा ती आपल्या मतांचं अनमोल दान संबंध मतदार संघाचा विकास करण्याकरिता उमेदवाराच्या झोळीत विश्वासाने घालत असते. निवडणुकीत निवडून आलेल्या उमेदवाराने आपल्याला निवडून दिलेल्या मतदारांच्या दानाशी बांधील व कृतज्ञ राहून संपूर्ण मतदार जनतेची पाचही वर्ष सातत्याने व प्रामाणिकपणे काम करणे अपेक्षित असते. परंतु फलटण-कोरेगाव विधानसभा मतदारसंघात मात्र तसे होताना दिसत नाही. फलटण तालुक्यातील मतदार जनता 15 वर्षात धक्के खाऊन खाऊन सुज्ञ झालेली आहे. मतदार जनता आता निवडणुकीची वाट पाहत असुन “आता फलटणचा आमदार बदलायचाय” या भूमिकेत असल्याचे फलटण तालुका प्रजा गटाचे प्रमुख प्रदीप झणझणे यांनी स्पष्ट केले.