पुणे:-(आंबेगाव)-जबरी चोरीच्या गुन्हयातील आरोपी केले २४ तासात जेरबंद -आंबेगाव पोलीस स्टेशन व गुन्हे शाखेची कौतुकास्पद कामगिरी.
पत्रकार अब्दुल रहीम शेख कात्रज शहराध्यक्ष

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
RPS STAR NEWS ( माहिती आणि प्रसारण मंत्रालय दिल्ली नोंदणीकृत )
जबरी चोरीच्या गुन्हयातील आरोपी केले २४ तासात जेरबंद -आंबेगाव पोलीस स्टेशन व गुन्हे शाखेची कौतुकास्पद कामगिरी.
फिर्यादी नामे अभिजीत विष्णु पवार यांचा श्री. गणेश ट्रेडर्स अॅन्ड पत्रा डेपो या नावाने येडशी, धाराशिव येथे व्यवसाय असुन ते पुण्यामध्ये पत्रा स्टीलचे साहित्य पुरवठा करण्याचे काम करतात. फिर्यादी हे दिनांक १५/०७/२०२५ रोजी पुण्यामधील बांधकाम व्यावसायीक यांना पुरवलेल्या मालाचे पैसे घेण्याकरीता आले होते. त्यावेळी त्यांच्याकडे एकुण ४० लाख रुपये रोख रक्कम एका बॅगमध्ये ठेवलेली होती. अभिजीत पवार हे एक्सेला प्लाझा बिल्डींग, बाबजी पेट्रोलपंप आंबेगाव, पुणे येथे मालाच्या बिलाच्या पैशाबाबत विचारणा करीता जात असताना त्यांनी सदरची पैशाची बॅग ही त्यांचेसोबत असलेला त्यांचा मित्र मंगेश ढोणे यांच्याकडे दिली होती. ते दोघे बाबजी पेट्रोलपंपाजवळुन कंपनीच्या ऑफिसमध्ये पायी चालत जात असताना एक काळया रंगाची महिंद्रा थाड गाडी त्यांच्या जवळ येवुन थांबली. त्या गाडीमधुन दोन इसम खाली उतरले व त्यांनी मंगेश ढोणेच्या खांदयावरील बॅग हिसकावुन घेतली. अभिजीत पवार यांनी लागलीच ड्राईव्हरच्या दिशेने धाऊन गाडीची चावी काढण्याचा प्रयत्न केला परंतु त्यावेळी चालकाने त्यांच्या तोंडावरती जोरात ठोसा मारल्याने ते खाली पडले. तेवढयात मंगेश ढोणेकडुन पैशाची बॅग हिसकावणारे दोघेजण व चालक हे तिघे त्या काळया रंगाच्या चारचाकी गाडीमधुन येवुन पैशाची बॅग घेवुन आरोपी नवले ब्रिजच्या दिशेने पळुन गेले. सदर घटनेबाबत अभिजीत पवार यांनी तक्रार दिल्याने इकडील पोलीस ठाण्यास गु.र.नं.१५८/२०२५ भारतीय न्याय संहिता कलम ३०९ (६), ३(५) अन्वये गुन्हा दाखल करण्यात येवुन गुन्हयाचा पुढील तपास श्री. गजानन चोरमले, पोलीस निरीक्षक (गुन्हे), आंबेगाव पो.स्टे. हे करीत आहेत.
दाखल गुन्हयाच्या तपासा दरम्यान आरोपीतांनी गुन्हयात वापरलेल्या वाहनाचा क्रमांक एमएच १२ डब्लुई ००८५ असा निष्पन्न झाल्याने आरोपीतांच्या शोधाकरीता घटनास्थळावरील सी.सी.टी.व्ही. कॅमेरे चेक करुन तसेच गुप्त बातमीदारामार्फत माहिती घेवुन दाखल गुन्हयातील आरोपी नामे १) प्रदिप रामदास डोईफोडे रा. वरद हाईट्स, फ्लॅट नं. १११, इंगळेनगर, भुगाव, पुणे. २) मंगेश दिलीप ढोणे, रा. रामलिंगनगर, येडशी, जि.धाराशिव व एक विधीसंघर्षीत बालक यांना खंडोबा मंदिर रोड, भुगाव, पुणे येथुन ताब्यात घेवुन त्यांच्याकडुन पाच मोबाईल हॅन्डसेट, ९,३५,५००/- रुपये रोख रक्कम, एक काळया रंगाची थार गाडी तसेच गाडीमध्ये एमएच १२ डब्लुई ००८५ क्रमांकाच्या काढुन ठेवलेल्या चार नंबर प्लेट जप्त केल्या आहेत. गुन्हयातील अटक आरोपीतांकडे तपास करता फिर्यादीचा मित्र मंगेश ढोणे यानेच प्रदिप रामदास डोईफोडे व एक विधीसंघर्षीत बालक व इतर पाहिजे आरोपी यांना बातमी देवुन त्यांचे सोबत संगणमताने गुन्हा केल्याचे निष्पन्न झाले आहे.
सदरची कामगिरी मा.श्री. अमितेश कुमार पोलीस आयुक्त साो पुणे शहर, मा.श्री. रंजन कुमार शर्मा पोलीस सह आयुक्त पुणे शहर, मा.श्री. संजय बनसोडे अपर पोलीस आयुक्त पश्चिम प्रादेशिक विभाग, मा. श्री निखील पिंगळे, पोलीस उप आयुक्त, गुन्हे शखा पुणे शहर, मा.श्री. मिलींद मोहिते पोलीस उप आयुक्त परिमंडळ २ पुणे शहर व मा.श्री. राहुल आवारे सहा. पोलीस आयुक्त स्वारगेट विभाग पुणे शहर यांच्या मार्गदर्शनाखाली श्री विजय कुंभार वपोनि, खंडणी विरोधी पथक-२, पुणे शहर, श्री अंजुम बागवान, वपोनि, गुन्हे शाखा, युनिट-२ पुणे शहर, तसेच आंबेगाव पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री.शरद झिने यांचे सुचनेप्रमाणे पोलीस निरीक्षक (गुन्हे) श्री. गजानन चोरमले, गुन्हे शाखा युनिट २ चे सहा. पोलीस निरीक्षक, श्री अमोल रसाळ, अशिष कवठेकर, आंबेगाव पोलीस ठाणेचे तपास पथकाचे पोलीस उप निरीक्षक श्री. मोहन कळमकर, सपोफौ शैलेंद्र साठे, पोलीस हवालदार गणेश दुधाने, हनुमंत मासाळ, चेतन गोरे, स्मिता पवार, निलेश जमदाडे, धनाजी धोत्रे, सचिन गाडे, पोलीस अंमलदार आबासो खाडे, प्रमोद भोसले, योगेश जगदाळे, अजय कामठे, सुभाष मोरे, शिवा पाटोळे, ज्ञानेश्वर चित्ते, नितीन कातुर्डे, राजेश टेकावडे, हरिष गायकवाड तसेच अवदुत जमदाडे पोउआ परि-०२ कार्यालय पुणे शहर व गुन्हे शाखा युनिट-२ चे पोलीस अंमलदार ओंकार कुंभार, अमोल सरडे व पवन भोसले यांनी केली आहे.
(शरद झिने)
वरिष्ठ पोलीस निरीक्षक आंबेगाव पोलीस स्टेशन, पुणे शहर