आरोग्य व शिक्षणताज्या घडामोडीमहाराष्ट्र

सातारा:-श्री गणरायाच्या पूजा आर्चासाठी लाडक्या काकांची प्रतीक्षा…

ज्येष्ठ पत्रकार अजित जगताप सातारा 

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483

 ज्येष्ठ पत्रकार अजित जगताप सातारा

RPS STAR NEWS

श्री गणरायाच्या पूजा आर्चासाठी लाडक्या काकांची प्रतीक्षा…

सातारा दि: प्रत्येक धार्मिक गोष्टीला विधिवत पूजेला अत्यंत महत्त्व आहे. शास्त्रोयुक्त व मंत्रोपचारने पूजा केली तरच ती फायदेशीर ठरते. अशी मनाशी खुणगाठ बांधण्यात आलेली आहे. त्यामुळे श्री गणरायाच्या आगमनानंतर आता पूजाअर्चासाठी लाडक्या काकांची प्रतीक्षा सर्वांनाच लागलेली आहे. अनेक थोर युगपुरुषांच्या पाठीशी पुरोगामी व विद्वान काका असल्यामुळेच खऱ्या अर्थाने क्रांती झाल्याची ही अनेक उदाहरणे आहेत.

केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर भारतातील मंदिरांच्या प्रवेशद्वारावर गणपतीचे चित्र कोरलेले असते. तिला गणेशपट्ट असे संबोधले जाते. महाराष्ट्रातील घरांच्या मुख्य दारावर गणेशपट्टी वा गणेशप्रतिमा असते. गणपती हा विघ्नहर्ता असल्याने घरावर येणाऱ्या विघ्नांचे म्हणजे संकटांचे तो निवारण करेल. ही भावना त्यामागे असते. त्यातच ब्राह्मण काकांच्या हस्ते श्री गणरायाची प्रतिष्ठापना केल्यामुळे खऱ्या अर्थाने पुण्य लाभते. यामुळे आता काकांना आग्रहाचे निमंत्रण देऊन अनेक ठिकाणी पूजाअर्चा व श्री सत्यनारायणाच्या महापूजेसाठी विधिवत मंत्रोच्चार करण्यासाठी त्यांना बोलविले जात आहे.
वेद शाळेतून प्रशिक्षण घेतलेल्या अनेक बाल ब्रह्मचारी व काका आता विधिवत पूजा करण्यासाठी आपापल्या निमंत्रण ठिकाणी जाण्यासाठी सज्ज झालेले आहेत. श्री गणरायाच्या आरती- पूजा व श्री सत्यनारायणाची महापूजा करण्यासाठी प्रत्येक काकांना दक्षिणा सुद्धा द्यावी लागते. काही ठिकाणी कोरडा शिधा देऊन तसेच काकाचा मान सन्मान ठेवून त्यांना निरोप ही दिला जातो. यावेळी वडीलधारी मंडळींचा काकांनाही नमस्कार करून त्यांचे आशीर्वाद घेतले जातात.
अगदी अलीकडे, गणेश चतुर्थी केवळ मंदिरे आणि घरांमध्येच नव्हे तर ऑनलाइन पूजाअर्चा करून साजरी केली जाते. अनुयायी आता ॲप्स, सोशल मीडिया आणि वेबसाइट्सद्वारे विधी आणि पूजा समारंभ करू शकतात. ज्यात व्हर्च्युअल स्पेसमध्ये विधी साजरे करण्याचे मार्ग तसेच विधी उत्सवावरच अधिक माहिती दिली आहे.
ऑनलाइन पूजा पद्धतीने मुळे काही काकाच पूजेसाठी हवा आहे. ही समजूत आता विज्ञान युगात लोप पावत चाललेले आहे. सातारा जिल्ह्यात सुमारे तीनशे वेद भवन मधून प्रशिक्षण घेतलेले काका सर्वत्र संचार करून विधिवत पूजाअर्चा करत आहेत. काहींचे तीन पिढ्याशी ऋणानुबंध जपले गेलेले आहेत. तिथी व पंचांग आणि शुभमुहूर्तावरच विधी करण्यासाठी त्यांना निमंत्रण देण्याशिवाय गत्यंतर नसल्याचेही दिसून आलेले आहे.
गणेश चतुर्थी साजरी करण्यासाठी आयोजित पूजा (देवतेची वैयक्तिक पूजा) मुलांनी स्वतःच करावी. यासाठी अँड्रॉइड ॲप डिझाइन केलेले आहे . या ऑनलाइन पॅम्फ्लेटमध्ये परंपरेने पूजेशी संबंधित कथाही उपलब्ध आहेत. सध्या आठ ॲपच्या माध्यमातून पूजाअर्च सांगण्याचे नव तंत्र विकसित झालेले आहे. त्यांपैकी काहींकडे जपासाठी मंत्र (आध्यात्मिक म्हण) आहेत, इतरांकडे भक्तीगीते आहेत आणि एक म्हणजे गणेश चतुर्थी साजरी करण्यासाठी योग्य पूजा कशी करावी? हे मॅन्युअल आहे. सध्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना चांगलीच गाजत असताना आता श्री गणरायाच्या आगमनानंतर पूजा आर्ची साठी सार्वजनिक व व्यक्तिगत गणेशोत्सव साजरा करताना लाडका काका यांची प्रतीक्षा करावी लागत आहे. तसं पाहिलं तर भारतीय परंपरेनुसार काकांच्या हस्ते नामकरण पासून ते शेवटच्या विधी पर्यंत त्यांना बोलून धार्मिक विधी करावा लागतो. भारतीय परंपरा म्हटले जात आहे. हे सुद्धा खरे आहे.

ACLS TIMES” YOUTUBE चॅनेल ला LIKE SUBSCRIBE आणि COMMENT करा. 🙏

ACLS इंटरनॅशनल प्रेस रिपोर्टर असोसिएशन

शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button