साताऱ्यात पीपल्स रिपब्लिकन आंदोलनाला सत्ताधारी व विरोधी आमदारांचा पाठिंबा.
ज्येष्ठ पत्रकार अजित जगताप सातारा

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
ज्येष्ठ पत्रकार अजित जगताप सातारा
RPS STAR NEWS
साताऱ्यात पीपल्स रिपब्लिकन आंदोलनाला सत्ताधारी व विरोधी आमदारांचा पाठिंबा.
सातारा दि: सातारा जिल्ह्यातील अवैद्य दारू, गुटखा, मटका, गांजा व जुगार विरोधात पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष रमेश अनिल उबाळे यांनी आंदोलन सुरू केले आहे. या आंदोलनाला वाढता पाठिंबा मिळत असून महायुतीचे आमदार महेश शिंदे व महाविकास आघाडीचे आमदार शशिकांत शिंदे यांच्यासह अनेक मान्यवरांनी पाठिंबा दिला आहे .सातारा जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक समीर शेख यांच्याशी संपर्क साधून तातडीने कारवाई करण्याची जोरदार मागणी केली.
सातारा जिल्ह्यातील अवैद्य धंदे मटका गुटका जुगार तसेच दरीत पद दलित व महिलांवर होणाऱ्या अत्याचारासंदर्भात जिल्हा प्रशासन व पोलीस यंत्रणेला जागे करण्यासाठी पीपल्स रिपब्लिकन पक्षाच्या वतीने सातारा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर चार दिवस लोकशाही मार्गाने आंदोलन होत आहे .वास्तविक पाहता सातारा बस स्थानक येथील पोलीस कर्मचाऱ्याला मारहाण करण्यात आली. याच बस स्थानक शेजारी मटका व गांजा विक्री खुलेआम केली जाते. गुन्हेगारी वाढलेली आहे. पोलीस यंत्रणा कागदपत्रे कारवाई करते. सकाळी धाड आणि दुपारी पुन्हा ते धंदे सुरू होतात. हे राहट गाडगे सुरूच आहे. कारवाई केली असे पोलीस सांगतात .पण काहींची हफ्तेबाजी राजरोसपणाने सुरूच आहे . याबाबत उत्तर देत नाहीत .यामुळे सत्ताधारी लोकप्रतिनिधीला सुद्धा कारवाईची मागणी करावी लागते. त्यामुळे निवडणुकीच्या पूर्व काही काळ हे बेकायदेशीर धंदे बंद करावे .अशी सत्ताधारी आमदारांची मागणी आहे तर दुसऱ्या बाजूला विरोधी पक्षाच्या आमदारांनी ही अनधिकृत धंदे व मटका जुगार आणि अमली पदार्थ विक्रीवर अंकुश ठेवण्यासाठी एकमत केले आहे. आता पोलीस यंत्रणेने कर्तव्य दक्षता दाखवून हे धंदे बंद करावे. अशी जोरदार मागणी या निमित्त होत असून पीपल्स रिपब्लिकन पक्षाचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष श्री रमेश उबाळे जिल्हा अध्यक्ष युवराज कांबळे, नितीन रोकडे ,बाबुराव चव्हाण, संदीप कांबळे, नितीन शिंदे यांच्यासह संभाजी ब्रिगेडचे पैलवान अनिल जाधव, पैलवान सागर साळुंखे, सामाजिक कार्यकर्ते संतोष जाधव, गौरव जाधव, शिवसेनेचे हनुमंतराव चवरे ,आर.पी.आय.चे अशोक गायकवाड, संजय गाडे, धर्मवीर युवा मंच अमोल खोपडे, पॅंथर सेनेचे आदित्य गायकवाड, राष्ट्रवादी ओबीसी सेलचे विजय बोबडे सामाजिक कार्यकर्ते संग्राम बर्गे , भीमशक्तीचे अरुण पवार, अमर गायकवाड आदी मान्यवरांनी पाठिंबा दिला आहे.
चौकट —– बेकायदेशीर गोष्टी सातारा जिल्ह्यात घडू नये यासाठी पहिला प्रयत्न करणारे पीपल्स रिपब्लिकन पक्षाच्या आंदोलनाला सत्ताधारी व विरोधी पक्षाच्या आमदारांनी पाठिंबा देऊन खऱ्या अर्थाने जनतेचे मूलभूत प्रश्न सोडवण्यासाठी एकत्र भूमिका घेतल्याबद्दल साताऱ्यातील शांतता प्रिय नागरिकांनी दोन्ही आमदारांचे मनःपूर्वक आभार मानले आहेत तसेच पीपल्स रिपब्लिकन पक्षाचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष श्री रमेश अनिल उबाळे यांनी कोणताही मुलाहिजा न ठेवता आंदोलन सुरू ठेवून कारवाई करण्यासाठी जिल्हा प्रशासन पोलीस यंत्रणेला प्रवृत्त केल्याबद्दल तमाम माता-भगिनी व जेष्ठ नागरिक व युवकांनी त्यांचे मनःपूर्वक आभार मानले आहेत.