साताऱ्यातील शिवतीर्थावर राष्ट्रवादी वतीने सरकार निषेधार्थ आंदोलन.
ज्येष्ठ पत्रकार अजित जगताप सातारा

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
ज्येष्ठ पत्रकार अजित जगताप सातारा
RPS STAR NEWS
साताऱ्यातील शिवतीर्थावर राष्ट्रवादी वतीने सरकार निषेधार्थ आंदोलन.
सातारा दि: मालवण तालुक्यातील राजकोट येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पूर्णाकृती पुतळा कोसळला. यामुळे महाराष्ट्राची मोठ्या प्रमाणात जगभर बदनामी झाली. या अनुषंगाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने सातारा येथील शिवतीर्थावर आज दुपारी भर पावसात पक्षाच्या वतीने जोरदार निदर्शने व आंदोलन करण्यात आले. यावेळी काही काळ वाहतूक ठप्प झाली होती.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते दीपक पवार, सरचिटणीस राजकुमार पाटील, महिला प्रदेश सदस्य समिंद्रा जाधव, विजय बोबडे, अतुल शिंदे, शिवराज फाळके, प्रताप जगदाळे, इस्माईल मुल्ला, अझर मनेर , नाथाजी बाबर , प्रथमेश पवार,अनिल बडेकर, भानुदास भोसले, सचिन जाधव, सुशांत जाधव, तुषार परीट यांच्यासह मोठ्या संख्येने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी जोरदार घोषणाबाजी केली. यावेळी हातात फलक घेण्यात आले होते. शिवरायांचा अपमान सहन करणार नाही,,, खोके वाल्यांना पुन्हा सत्तेत येऊ देणार नाही,,,, पुतळा नवे स्वाभिमान कोसळला,,,, फक्त समुद्र नव्हे महाराष्ट्र खवळला,,,, राजे आम्हाला माफ करा पण बेईमान गद्दारांना साफ करा,,, असे फलक निदर्शकांनी हाती घेतले होते. यावेळी मोठ्या प्रमाणात सातारा शहर पोलीस कर्मचारी व काही प्रसारमाध्यमाने रस्त्यावर गर्दी केली होती. छत्रपती शिवाजी महाराजांच्या बद्दल त्यांच्या राजधानीतच घडलेल्या घटनेच्या निषेधार्थ महापूर उसळला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे उद्घाघाटन देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले होते. त्याला एक वर्ष पूर्ण होण्याच्या अगोदरच ही दुर्दैवी घटना घडल्यामुळे सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.
आता पुन्हा त्या जागी काळजीपूर्वक काम करून छत्रपती शिवाजी महाराजांचा भक्कम व मजबूत पुतळा उभा राहील. परंतु ,जो बूँद से गई व हौद से नही आती.. मोदी है तो मुनकीन है हे सुद्धा खरे झालेले आहे. अशा शब्दांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे युवा जिल्हाध्यक्ष मकरंद बोडके, स्वप्निल वाघमारे व शफिक शेख यांनी प्रतिक्रिया दिलेली आहे. …. . . ……… ……… फोटो- सातारा शहरातील शिवतीर्थ या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष च्या वतीने निदर्शने करताना मान्यवर (छाया- अजित जगताप, सातारा)