वाई:-स्व.यशवंतराव चव्हाण यांच्या विचारांचा खरा वारसदार म्हणून स्व.प्रतापराव भोसले यांच्याकडे मी स्वाभिमानाने पाहतो..” प्रा.श्रीकृष्ण जोशी.
पत्रकार वैष्णवी शिंदे पुणे जिल्हा महिला PRR

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
पत्रकार वैष्णवी शिंदे पुणे जिल्हा महिला PRR
RPS STAR NEWS ( माहिती आणि प्रसारण मंत्रालय दिल्ली नोंदणीकृत )
वाई दि.20
स्व. यशवंतराव चव्हाण यांच्या विचारांचा खरा वारसदार म्हणून स्व. प्रतापराव भोसले यांच्याकडे मी स्वाभिमानाने पाहतो..” प्रा. श्रीकृष्ण जोशी.
महाराष्ट्राच्या राजकारणात स्व. यशवंतराव चव्हाण यांच्या विचारांचा, आदर्शांचा खऱ्या अर्थाने वारसदार म्हणून स्व. प्रतापराव भोसले उर्फ भाऊ यांच्याकडे मी स्वाभिमानाने पाहतो कारण स्व. यशवंतराव चव्हाण यांच्या पश्चात भाऊंनी राजकारणातून नैतिक मूल्यांची जपणूक करून नि:स्वार्थ, पारदर्शीपणे जे समाजकारण केले त्याला तोड नाही. स्व. यशवंतराव चव्हाणसाहेबांचे अंत्यसंस्कार कराड येथे होण्यास भाऊचे योगदान अनन्यसाधारण असे आहे. त्यामुळे त्यांच्या ऋणात संपूर्ण महाराष्ट्र राहिला पाहिजे. निष्ठा कशी असावी किंवा ठेवावी ते स्व. प्रतापराव भोसले यांच्याकडून शिकण्यासारखे होते. कराड येथील प्रीती संगमावरील स्व.यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीचे संपूर्ण श्रेय मा. प्रतापराव भोसले भाऊ व मा. पी डी पाटीलसाहेब यांच्याकडे जाते हे कोणीही नाकारू शकत नाही. भाऊंचे व्यक्तिमत्व अतिशय लोभस होते. राजकारणात स्पष्टपणे विचार मांडणारा हा एकमेव नेता म्हणून महाराष्ट्रातच नव्हे तर देशपातळीवरही त्यांच्याकडे पाहिले जात होते. सार्वजनिक जीवनामध्ये काम करताना कायद्याचे, नियमांचे ज्ञान असलेच पाहिजे. असा भाऊंचा अट्टाहास होता. भाऊंचे व्यक्तिमत्व अतिशय शिस्तप्रिय होते.कडक स्वभाव, निटनेटकेपणा, तीक्ष्ण नजर, पारदर्शी कारभार, नैतिकता, निःस्वार्थ सेवाभाव असे विविध पैलू त्यांच्या व्यक्तिमत्वात होते.” असे प्रतिपादन प्रा.श्रीकृष्ण जोशी यांनी केले.
येथील किसन महाविद्यालयाच्या वतीने जनता शिक्षण संस्थेचे माजी अध्यक्ष व विश्वस्त स्व. प्रतापराव भोसले उर्फ भाऊ यांच्या दहाव्या मासिक पुण्यस्मरण दिनानिमित्त आयोजित व्याख्यानात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. गुरूनाथ फगरे होते.
याप्रसंगी जनता शिक्षण संस्थेचे अध्यक्ष मा. मदनदादा भोसले, सचिव डॉ. जयवंत चौधरी, श्री मोहनआबा भोसले, अँड. प्रताप देशमुख, श्री. प्रकाश पाटील, श्री. संभाजीराव पाटील, श्री. चंद्रकांत इंगवले, उपप्राचार्य श्री. भिमराव पटकुरे, डॉ. चंद्रकांत कांबळे, स्टाफ सेक्रेटरी डॉ.अंबादास सकट, कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य श्री. बाळासाहेब कोकरे, पर्यवेक्षक श्री. अर्जुन जाधव, माजी प्रभारी प्राचार्य प्रा. रमेश डुबल, माजी प्रभारी प्राचार्य डॉ. एकनाथ भालेराव प्रा. रामचंद्र बारगजे, प्रा. प्रकाश जाधव. श्री. विवेक सुपेकर, श्री. गणेश चव्हाण हे मान्यवर उपस्थित होते.
प्रा. जोशी पुढे म्हणाले की.” किसन वीर महाविद्यालयातील सायन्स विभागाची भव्य इमारत लोकवर्गणीतून भाऊंनी उभी केलेली आहे. माझ्या नोकरीच्या कालखंडात प्राध्यापक संघटनेच्या माध्यमातून प्राध्यापकांच्या अनेक समस्यांचे समाधान भाऊंनी केले. स्व. प्रतापराव भोसले यांच्या संपूर्ण राजकीय जीवनाचा, राजकीय विचारांचा प्रवास याबद्दल संशोधन झाले पाहिजे म्हणजे येणाऱ्या पिढीला भाऊंचे विचार,राजकारण,समाजकारण कळून येईल. आपल्या अध्यक्षीय भाषणामध्ये प्राचार्य डॉ. गुरुनाथ फगरे म्हणाले की, “स्व. भाऊंनी स्वतःच्या जीवनामधून जो आदर्श समाजासमोर ठेवला आहे त्यामधून आपणाला खूप काही घेण्यासारखं आहे. सामान्यातल्या सामान्यालाही आपला वाटावा असा नेता म्हणून भाऊंनी आपले व्यक्तिमत्व उभे केले. भाऊंच्या विचारांचे पाईक आपण झालो पाहिजे. शिस्तप्रिय, कर्तव्यदक्ष, कायदेतज्ञ अशी गुणवैशिष्ट्ये भाऊंच्या व्यक्तिमत्वात होती. भाऊंचा सहवास ज्यांना लाभला ते खरोखर भाग्यवंतच. असा हिमालयासारखा उत्तुंग असणारा नेता महाराष्ट्रात होणे नाही. दुर्दैवाने भाऊंचा सहवास मला फार थोड्या दिवसांचा लाभला. याची मला खंत वाटते. भाऊंच्या विचारांची कास धरून; तत्त्वनिष्ठ विचारांचा वारस होण्याचा प्रयत्न आम्ही करत आहोत. हाच आदर्श डोळ्यासमोर ठेवून आम्ही वाटचाल करीत आहोत. हे विचार समाजातील तळागाळापर्यंत पोहोचले पाहिजेत. हा उद्देश ठेवून; त्यांच्या पुण्यस्मरणाच्या निमित्ताने या व्याख्यानमालांचं आयोजन केलेले आहे आणि ते सार्थक होईल अशी मला आशा आहे.”
कार्यक्रमाच्या सुरुवातीला स्व. प्रतापराव भोसले यांच्या प्रतिमेस पुष्पहार घालून वंदन करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन डॉ. अंबादास सकट यांनी केले. उपस्थित सर्वांचे आभार कनिष्ठ महाविद्यालयाचे पर्यवेक्षक श्री. अर्जुन जाधव यांनी मानले. या कार्यक्रमाप्रंसगी वरिष्ठ व कनिष्ठ महाविद्यालयातील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, जनता शिक्षण संस्थेच्या सर्व हायस्कूल मधील शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व स्वर्गीय प्रतापराव भोसले यांच्यावर प्रेम करणारे असंख्य कार्यकर्ते, तसेच महाविद्यालयातील विद्यार्थी-विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.