पुसेसावळी:-राहुल सावंत इंग्लिश मिडियम स्कूल पुसेसावळी शाळेचे तालुकास्तरीय बुद्धिबळ स्पर्धेत घवघवीत यश.
पत्रकार विनोद पाटील सातारा जिल्हाध्यक्ष

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
पत्रकार विनोद पाटील सातारा जिल्हाध्यक्ष
RPS STAR NEWS
खटाव
राहुल सावंत इंग्लिश मिडियम स्कूल पुसेसावळी शाळेचे तालुकास्तरीय बुद्धिबळ स्पर्धेत घवघवीत यश.
खटाव( सातारा ):- शहाजीराजे विद्यालय खटाव येथे आज घेण्यात आलेल्या 14 वर्षाखालील मुले व मुलींची बुद्धिबळ स्पर्धा आयोजित करण्यात आली. या स्पर्धेत राहुल सावंत इंग्लिश मिडियम स्कूल पुसेसावळी थोरवेवाडी ता. खटाव जि. सातारा. शाळेचे विद्यार्थी यांनी तालुकास्तरीय बुद्धिबळ स्पर्धेत विरेन जगदाळे व असिया खान या दोन विद्यार्थ्यांना बुद्धिबळ स्पर्धेत यश मिळाले . तसेच त्यांची जिल्हास्तरीय बुद्धिबळ स्पर्धेसाठी निवड करण्यात आली .
या यशाबद्दल सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे युनिटी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष श्री. मधुकर सावंत( भाऊ), संस्थेचे उपाध्यक्ष जीवन सावंत ( दादा ), संस्थेच्या सचिव सौ. अश्विनी सावंत मॅडम, शाळेचे मुख्याध्यापक श्री. हणमंत ठोंबरे सर व शाळेच्या सुपरवायझर सौ. कविता भोसले यांनी सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. प्रशिक्षक म्हणून श्री. योगेश माने यांनी काम पाहिले.