आरोग्य व शिक्षणताज्या घडामोडीमहाराष्ट्र

राहाता – न्यू इंग्लिश स्कूल कनकुरी शाळेतील माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा कार्यक्रम शिकलेल्या शाळेतच उत्साहात संपन्न.

पत्रकार वसंत काळे अहमदनगर जिल्हा सचिव 

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483

 पत्रकार वसंत काळे अहमदनगर जिल्हा सचिव

RPS STAR NEWS

राहाता प्रतिनिधी- *कनकुरी शाळेतील २००८-०९ च्या बॅचच्या विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा व शिक्षक कृतज्ञता सोहळा रविवार दि.१८.०८.२०२४ रोजी उत्साहात पार पडला.

२००८-२००९ च्या सर्व विद्यार्थ्यांनी एकत्र येत स्नेहमेळावा शाळेत सर्व शिक्षकांच्या उपस्थितीत पार पडला. यावेळी तब्बल १५ वर्षानंतर भेट झाल्याने सर्वच विद्यार्थी विद्यार्थिनी खूप उत्साही होते, शाळेतील आठवणींना उजाळा देणारा एक अभूतपूर्व दिवस… कार्यक्रमाची सुरुवात प्रार्थनेने करून कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थान शाळेच्या माजी मुख्याध्यापिका श्रीमती लताताई लक्ष्मण डांगे यांना देण्यात आले त्यानंतर उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलनाचा कार्यक्रम झाला माजी विद्यार्थ्यांचे परिचय सत्र झाले त्यानंतर देवाज्ञा झालेल्या कविता सरोदे,सुवर्णा शिंदे,सचिन रोहम, दत्तात्रय काळे या चार मित्र मैत्रिणींना श्रद्धांजली वाहून त्यानंतर माजी विद्यार्थ्यांनी शिक्षकांना शिक्षक कृतज्ञता सन्मान चिन्ह (ट्रॉफी),शॉल,फळांची झाडे देऊन त्यांचा सन्मान केला. शाळेसाठी छोटीशी भेटवस्तू म्हणून एक कपाट, दहा खुर्च्या, दिल्या. त्याचप्रमाणे २००८-२०००९ च्या बॅचच्या प्रत्येक विद्यार्थी व विद्यार्थीनीला या गेट -टुगेदर कार्यक्रमाची सर्वांना एक कायम स्वरूपी आठवण असावी म्हणून प्रत्येकाला स्मृतिचिन्ह (ट्रॉफी )व फळझाडाचे रोप वाटप करण्यात आले. यावेळी विद्यार्थ्यांचे मनोगत, शिक्षकांचे मनोगत, अध्यक्षांचे भाषण झाले विद्यार्थ्यांनी शाळेचे व शिक्षकांचे आभार मानले. स्नेह भोजनाचा आस्वाद माजी विद्यार्थी-विद्यार्थीनी व शिक्षक इतर कर्मचारी व मान्यवर यांनी घेतला. गप्पा गोष्टी करत एकमेकांच्या जुन्या आठवर्णीना उजाळा देण्यात आल्या . जुन्या आठवणी सांगत सर्वांना जुने दिवस आठवत होते. बॅचमधील सर्व विद्यार्थी हे विविध सामाजिक, राजकीय, शैक्षणिक, व्यवसायिक, शासकीय,खाजगी नोकरी, शेती या क्षेत्रात यशस्वी झाले आहेत.
याप्रसंगी शाळेच्या माजी मुख्याध्यापिका श्रीमती लताताई लक्ष्मण डांगे मॅडम, श्री.सोनवणे सर, श्री.रहाणे सर, श्री.चौधरी सर, श्री.आभाळे सर, श्री.निकाळे सर श्री.भावसार सर, श्री.गायकवाड सर, श्री.माधव डांगे, न्यू इंग्लिश स्कूल कणकुरी शाळेतील २००८-०९ बॅच मधील सर्व माजी विद्यार्थी-विद्यार्थिनी आदी उपस्थित होते देवाज्ञा झालेल्या माजी विद्यार्थ्यांच्या स्मरणार्थ शाळेच्या आवारात दोन नारळाची व दोन प्राजक्ताची रोपे लावून वृक्षारोपण केले.
कार्यक्रमाची सांगता पसायदानाने करून शाळेचा पुन्हा एकदा निरोप माजी विद्यार्थ्यांनी घेतला.
सोहळा मैत्रीचा क्षण आठवणींचा…!

ACLS TIMES” YOUTUBE चॅनेल ला LIKE SUBSCRIBE आणि COMMENT करा. 🙏

ACLS इंटरनॅशनल प्रेस रिपोर्टर असोसिएशन

शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button