सातारा जिल्हा बँकेतील भरतीबाबत दि.२३ रोजी मोफत कार्यशाळा..
ज्येष्ठ पत्रकार अजित जगताप सातारा

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
ज्येष्ठ पत्रकार अजित जगताप सातारा
RPS STAR NEWS
सातारा जिल्हा बँकेतील भरतीबाबत दि.२३ रोजी मोफत कार्यशाळा..
सातारा: सातारा शहरातील कर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठाचे घटक महाविद्यालय धनंजयराव गाडगीळ वाणिज्य महाविद्यालय, सातारा बँकिंग स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र कार्यरत आहे. शुक्रवार दिनांक २३ ऑगस्ट रोजी एक दिवसय मोफत कार्यशाळा आयोजित केलेली आहे.
सध्या सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक या बँकेने २६३ लिपिक व ६० शिपाई या पदासाठी नोकर भरती होत आहे . ही सर्व पदे स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून भरती केली जाणार आहे. जे उमेदवार या बँकेतील पदासाठी इच्छुक आहेत अशा उमेदवारांची गणितीय अभियोग्यता, बुद्धिमापन चाचणी, बँकिंग, सहकार, अर्थशास्त्र, मराठी, इंग्रजी, संगणक व माहिती तंत्रज्ञान या विषयावर आधारित ऑनलाइन परीक्षा होणार आहे. या भरती परीक्षेच्या पूर्वतयारीसाठी युवक युवतींना अचूक मार्गदर्शनाची आवश्यक आहे. हे मार्गदर्शन करण्यासाठी धनंजयराव गाडगीळ वाणिज्य महाविद्यालयातील बँकिंग स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्राद्वारे भरती परीक्षेबाबत दिनांक २३ ऑगस्ट २०२४ रोजी सकाळी १०.०० वाजता मोफत एकदिवशीय कार्यशाळा संपन्न होणार आहे. सदर कार्यशाळा सर्व इच्छुक युवक युवतींसाठी मोफत व खुली आहे. इच्छुक युवक युवतींनी या मोफत कार्यशाळेसाठी नावनोंदणी करून कार्यशाळेचा लाभ घ्यावा. असे आवाहन केंद्राचे संचालक प्रा. डॉ. विजय कुंभार व महाविद्यालयाचे प्राचार्य प्रो. डॉ. विठ्ठल सावंत यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी ८८८८७८०५५४ वर संपर्क साधावा. असे कळविण्यात आलेले आहे. दरम्यान,सातारा जिल्हा मध्यवर्ती बँक नोकर भरतीतून किमान ४० हजार अर्ज येणार आहेत .त्यामुळे मोठ्या प्रमाणात गुणवत्ताधारक उमेदवारांनाच संधी मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. या मोफत कार्यशाळेमुळे अनेकांना परीक्षा कशा पद्धतीने द्यावी ? याचे बहुमूल्य मार्गदर्शन मिळणार आहे.