जावळी:-(सायगाव)-श्रीमती कांताबाई जगताप यांचे निधन.
ज्येष्ठ पत्रकार अजित जगताप सातारा

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
ज्येष्ठ पत्रकार अजित जगताप सातारा
RPS STAR NEWS
श्रीमती कांताबाई जगताप यांचे निधन.
सायगाव जुन्या जमान्यातील आंबेडकरी चळवळीची माहिती असणाऱ्या श्रीमती कांताबाई जगन्नाथ जगताप वय-९० यांचे आज राहत्या घरी सायगाव तालुका जावली येथे अल्पशा आजाराने निधन झाले. सामाजिक कार्यकर्ते रवींद्र जगताप यांच्या त्या मातोश्री होत. नागेवाडी ता. वाई येथील बनसोडे कुटुंबातील लेक होत्या .विवाह नंतर त्या सायगाव येथे स्थायिक झाल्या होत्या. त्यांनी अनेकांना सहकार्य केले . अनेक जुन्या आठवणींना उजाळा देण्याचे काम त्यांच्याकडून होत होते. आज त्यांच्या पश्चात विवाहित मुलगी व मुले नातवंड असा मोठा परिवार आहे. सायगाव येथील स्मशान भूमीमध्ये त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी मोठ्या संख्येने बौद्ध विकास सेवा संघाचे सर्व सहकारी व ग्रामस्थ उपस्थित होते. माजी अध्यक्ष श्री प्रेमानंद जगताप यांच्या त्या चुलती होत. मंगळवार दिनांक २० ऑगस्ट रोजी बौद्ध पद्धतीने धार्मिक विधी सायगाव येथे होणार असल्याची माहिती त्यांच्या नातेवाईकांनी दिली.