ताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकीय

कोरेगाव:-श्री बालाजी केमिकल कंपनीच्या नवीन तंत्रज्ञान पर्यावरण पूरक- नामदार महेश शिंदे

ज्येष्ठ पत्रकार अजित जगताप सातारा 

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483

 ज्येष्ठ पत्रकार अजित जगताप सातारा

RPS STAR NEWS

श्री बालाजी केमिकल कंपनीच्या नवीन तंत्रज्ञान पर्यावरण पूरक- नामदार महेश शिंदे

 

कोरेगाव दि ; कोरेगाव मतदार संघाचा विकास करताना या ठिकाणी उद्योग उभारणी करावी असं स्वप्न आम्ही दोघांनी पाहिले आहे. आतापर्यंत सात हजार लोकांना रोजगार देणार आहे . आता श्री बालाजी केमिकल च्या माध्यमातून श्री रमेश उबाळे यांनी दर्जेदार बांधकाम साहित्य व रोजगार उपलब्ध करण्यासाठी तसेच पर्यावरण पूरक काम हाती घेतले आहे. त्यामुळे माझ्या नेहमीच या प्रकल्पाला शुभेच्छा राहतील. असे प्रतिपादन कृष्णा खोरे विकास महामंडळाचे उपाध्यक्ष नामदार महेश शिंदे यांनी ल्हासुर्णे ता. कोरेगाव येथे झालेल्या श्री बालाजी केमिकल कंपनीच्या प्रकल्पाच्या उभारणी निमित्त केले.
या विधायक उपक्रमाने खऱ्या अर्थाने समाजकारण व राजकारणातून आता उद्योग व्यवसायातील उत्पादन क्षमता वाढवणारे प्रकल्प राबवून राबविण्यात आल्याबद्दल उद्योजक श्री रमेश अनिल उबाळे यांच्यावर मान्यवरांनी कौतुकाचा वर्षाव केला. प्रारंभ फटाक्याची आतिषबाजी व विधी पूर्वक पूजाअर्चा केल्यानंतर श्री बालाजी केमिकल कंपनीच्या प्रकल्पाच्या उभारणीचा उद्घाघाटन कृष्णा खोरे विकास महामंडळाचे उपाध्यक्ष नामदार महेश शिंदे यांच्या हस्ते झाले.
यावेळी मार्गदर्शन करताना नामदार शिंदे म्हणाले, उबाळे कुटुबियाचे संबंध खूप जवळचे आहेत. आज चांगले व्हिजन सुरू करून बांधकाम क्षेत्रात बदल घडत आहेत. नवीन तंत्रज्ञान विकसित होत असून त्या प्रकल्पाची उभारणी श्री रमेश उबाळे यांनी केलेली आहे. पूर्वी मातीच्या विटा होत्या. आता दर्जेदार व वजनाने हलक्या विटांमुळे बांधकामाचे आयुष्यमान वाढलेले आहे. त्यामुळे ग्राहक वर्गाने सुद्धा नवीन तंत्रज्ञान आत्मसात करून या श्री बालाजी केमिकल कंपनीच्या दर्जेदार व गुणवत्ताधारक उत्पादनातूनच आपले प्रकल्प उभे करावे. असे त्यांनी आवाहन केले.
उद्योजक श्री रमेश उबाळे यांनी आभार मानताना सांगितले की खऱ्या अर्थाने ब्रह्म- विष्णू- महेश असे जे त्रिदेव आहेत. त्याप्रमाणे माझ्या दृष्टीने माझे बंधू तथा मार्गदर्शक नामदार महेश शिंदे, राहुल बर्गे व निलेश यादव यांनी नेहमीच मला सहकार्य केलेले आहे. मतभेद जिवंतपणाची लक्षणे असतात. त्यामुळे मतभेदाचे विसर्जन करून आमदार महेश शिंदे यांनी मिठी मारले आणि त्या मतभेदाचा विषय संपलेला आहे.घरचे संबंध असल्या मुळे, डॉ अरुणा ताई बर्गे यांची ना कधी राखी चुकली ना या लहान भावाची भाऊबीज आम्ही आता त्यांच्यासोबत राहून त्यांच्या मार्गदर्शनाखाली किमान कोरेगाव मतदार संघात लाखभर रोजगार निर्माण करण्याचा नामदार महेश शिंदे पॅटर्न राबवण्याचा हा शुभारंभ आहे. भविष्यात लाख युवकांना रोजगार देऊन नामदार महेश शिंदे बेरोजगार मुक्त मतदार संघ करतील असे त्यांनी स्पष्ट केले.
खरं म्हणजे श्री बालाजी केमिकल कंपनी स्थापन करताना गुजरात व बेंगलोर येथील केमिकल आणून ते सातारा जिल्ह्यात वितरित करत होतो. परंतु उत्पादन खर्च, वाहतूक व इतर आवश्यक खर्च या सर्वांची आर्थिक घडी घालताना आपल्याच बांधकाम व्यवसायिकांना थोडा खर्च वाढत होता. त्यामुळेच जिथे पिकते तिथेच विकायची नवीन प्रयोग सुरू केलेला आहे. त्याला निश्चितच भरपूर यश मिळेल. यासाठी हा प्रकल्प उभारलेला आहे .
अत्यंत गुणवत्ताधारक व दर्जेदार तसेच अल्प किमतीमध्ये बांधकाम व्यवसायिकांना श्री बालाजी केमिकल कंपनीच्या वतीने हे केमिकल वितरित करण्यात येणार आहे. असे ही त्यांनी स्पष्ट केले .
या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने कोरेगाव मतदार संघासह सातारा जिल्ह्यातील बांधकाम व्यवसायिक, उद्योजक, व्यापारी व मित्रपरिवार,ल्हासुर्णे परिसरातील ग्रामस्थ यांच्या उपस्थितीमुळे खऱ्या अर्थाने आशीर्वाद लाभलेले आहेत. असे त्यांनी स्पष्ट केले. या कार्यक्रमाला श्री राहुल बर्गे, जिल्हा नियोजन समिती सदस्य, श्री निलेश यादव भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा तालुका अध्यक्ष, श्री सचिन देशमुख माझी स्टेट चेअरमन महाराष्ट्र बिल्डर असोसिएशन ऑफ इंडिया, सुधीरजी ठोके चेअरमन सातारा सेंटर बिल्डर असोसिएशन ऑफ इंडिया , युवराज कांबळे पीपल्स रिपब्लिकन पार्टी जिल्हाध्यक्ष,हर्षद वालावलकर , निलेश पाटील, मंगेश जाधव, सयाजी भोसले, श्री गोंदेकर, जगन्नाथ कुंभार, संतोष चव्हाण सरपंच ल्हासुर्णे ओबीसी जिल्हा अध्यक्ष राष्ट्रीय काँग्रेस पार्टी, किसान सावंत, प्रशांत सपकाळ, ही मान्यवर उपस्थित होते. ………..फोटो- श्री बालाजी केमिकल कंपनी उद्घाटन प्रसंग (छाया अजित जगताप कोरेगाव)

ACLS TIMES” YOUTUBE चॅनेल ला LIKE SUBSCRIBE आणि COMMENT करा. 🙏

ACLS इंटरनॅशनल प्रेस रिपोर्टर असोसिएशन

शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button