आरोग्य व शिक्षणताज्या घडामोडीमहाराष्ट्र

फलटण:-महाराष्ट्र पत्रकार कल्याण निधीतर्फे दिल्या जाणाऱ्या राज्यस्तरीय विशेष दर्पण पुरस्काराने फलटण येथील पत्रकार विक्रम विठ्ठल चोरमले सन्मानित.

राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण:-8208717483

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483

फलटण : महाराष्ट्र पत्रकार कल्याण निधीतर्फे दिल्या जाणाऱ्या राज्यस्तरीय दर्पण पुरस्काराचे नुकतेच वितरण करण्यात आले. यामध्ये विशेष दर्पण पुरस्काराने फलटण येथील पत्रकार विक्रम विठ्ठल चोरमले यांना सन्मानित करण्यात आले आहे.

महाराष्ट्र पत्रकार कल्याण निधी च्या वतीने पोंभुर्ले येथील दर्पण सभागृहात आयोजित राज्यस्तरीय पत्रकार दिन व दर्पण पुरस्कार वितरण समारंभात आयोजित करण्यात आला होता. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री ना. रवींद्र चव्हाण उपस्थित होते,
अध्यक्षस्थानी महाराष्ट्र पत्रकार कल्याण निधीचे अध्यक्ष रवींद्र बेडकीहाळ होते. व्यासपीठावर सिंधुदुर्गचे जिल्हाधिकारी किशोर तावडे, ज्येष्ठ पत्रकार राजाभाऊ लिमये, मराठवाडा विभाग साहित्य परिषदेचे अध्यक्ष डॉ. जगदीश कदम, महाराष्ट्र पत्रकार कल्याण निधीचे उपाध्यक्ष कृष्णा शेवडीकर, पोंभुर्ले गावच्या सरपंच सौ. प्रियांका धावडे आदींची प्रमुख उपस्थिती होती.

पुरस्कार वितरण सोहळा प्रारंभी बाळशास्त्रींच्या अर्ध पुतळ्यास अभिवादन व दीप प्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. त्यानंतर ३१ व्या राज्यस्तरीय दर्पण पुरस्कारांचे वितरण ना.रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी विशेष ‘दर्पण’ पुरस्कार देनिक सत्य सह्याद्री फलटण तालुका प्रतिनिधी विक्रम विठ्ठल चोरमले यांना देण्यात आला.

मान्यवरांचे स्वागत महाराष्ट्र पत्रकार कल्याण निधीचे उपाध्यक्ष कृष्णा शेवडीकर, विश्वस्त सौ.अलका बेडकिहाळ, गजानन पारखे, रोहित वाकडे, अरुण खरात यांनी केले. सूत्रसंचालन व आभार विश्वस्त अमर शेंडे यांनी मानले. या कार्यक्रमास जिल्हा महिती अधिकारी मुकुंद चिलवंत, माजी आमदार अजित गोगटे, राजन तेली, भाजपा जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, पोंभुर्ले गावचे उपसरपंच सादिक डोंगरकर आदींसह मान्यवरांची उपस्थिती होती.

फोटो ओळ
पत्रकार विक्रम विठ्ठल चोरमले यांना विशेष ‘दर्पण’ पुरस्कार प्रदान करताना ना. रवींद्र चव्हाण व रवींद्र बेडकिहाळ व ईतर मान्यवर

शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button