आरोग्य व शिक्षणग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

कराड:-जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कालगाव येथे बाल बाजार व महिलांसाठी हळदीकुंकू समारंभ आणि विविध स्पर्धा यांचे आयोजन.

पत्रकार सुशील पुजारी कराड तालुका प्रतिनिधी

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483

 पत्रकार सुशील पुजारी कराड तालुका प्रतिनिधी

कराड:-जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कालगाव येथे बाल बाजार व महिलांसाठी हळदीकुंकू समारंभ आणि विविध स्पर्धा यांचे आयोजन.

 दिनांक 19  रोजी बाल बाजार व महिलांसाठी हळदीकुंकू समारंभ त्याचबरोबर विविध स्पर्धा यांचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी विद्यार्थ्यांनी बालबाजारांमध्ये विविध वस्तू विकण्यासाठी आणलेल्या होत्या. यामध्ये बऱ्याच विद्यार्थ्यांनी हिरव्या पालेभाज्या, फळभाज्या त्याचबरोबर फास्टफूड,शेंगदाणे, चिक्की यासारखे पौष्टिक पदार्थ सुद्धा या बालबाजारात विकण्यासाठी विद्यार्थ्यांनी आणलेले होते. विद्यार्थ्यांना आर्थिक आणि व्यावहारिक ज्ञानाची भर पडावी यासाठी हा बाल बाजारात कालगाव शाळेमध्ये भरवण्यात आलेला होता. या बाल बाजाराच्या उद्घाटन व शुभारंभ शाळा व्यवस्थापन कमिटीचे सदस्य सौ.कांबळे मॅडम यांच्या हस्ते झाले याप्रसंगी कालगाव चे सरपंच सर्व श्री. सोमनाथ चव्हाण शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष महेश शिंदे कालगाव चे उपसरपंच योगेश चव्हाण ,शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य सुशील पुजारी, सलमा काझी, अमोल चव्हाण, विजय माळी त्याचबरोबर अनेक ग्रामस्थ पालक याप्रसंगी उपस्थित होते. या बाल बाजारात समर्थ हायस्कूल कालगाव चे मुख्याध्यापक कुंभार सर यांनी आवर्जून भेट दिली.त्यांच्यासोबत त्यांचे सर्व सहकारी देखील उपस्थित होते. महिलांच्या हळदी कुंकू समारंभ देखील मोठ्या उत्साहात पार पडला. याप्रसंगी महिलांचे विविध स्पर्धा घेण्यात आल्या संगीत खुर्च्या, इंडोर गेम,नावाचे उखाणे असे विविध स्पर्धा महिलांसाठी आयोजित करण्यात आलेल्या होत्या. याप्रसंगी या कार्यक्रमाचे स्वागत मुख्याध्यापक सौ जगदाळे मॅडम यांनी केले. प्रास्ताविक सौ.यादव मॅडम तर आभार तुषार घाडगे सर यांनी केले अतिशय उत्साहात हा कार्यक्रम संपन्न झाला.

शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button