सातारा जिल्हा परिषद आवारात वृक्षतोड पुरावा नष्ट करण्यासाठी हालचाली ….
ज्येष्ठ पत्रकार अजित जगताप सातारा

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
RPS STAR NEWS ( माहिती आणि प्रसारण मंत्रालय दिल्ली नोंदणीकृत )
सातारा जिल्हा परिषद आवारात वृक्षतोड पुरावा नष्ट करण्यासाठी हालचाली ….
सातारा दि: वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे.. असे साधुसंतांनी सांगून वृक्षाचे महत्व पटवून दिले होते. याची आठवण म्हणून अनेक जण रक्षाबंधन दिवशी वृक्षाला राखी बांधून त्याच्या संरक्षणाची हमी देतात. याला सातारा जिल्हा परिषद आवर अपवाद ठरला आहे. शनिवारी काही झाडाच्या फांद्या तोडल्यानंतर सामाजिक जाणीव असणाऱ्या दैनिकात बातमी प्रसिद्ध झाली. त्यानंतर तुटलेल्या फांद्याबाबत अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत. त्यामध्ये झाडाच्या फांद्या तोडल्याची परवानगी घेतली आहे का नाही? याचा जिल्हा परिषदेने खुलासा करणे गरजेचे आहे.
रक्षाबंधन दिवशीच भावाला खुश करण्यासाठी बहिणीची परवानगी नसतानाही वृक्षतोड झालेली आहे. सावली दिलेल्या मोठ्या फांद्या छाटण्यात आल्या आहेत. हा नजारा खिडकीतून काही अधिकारी निमुटपणे पाहत आहेत. अशी चर्चा सातारा आता जिल्हा परिषदेमध्ये नियमित व्हिजिट देणाऱ्या विजिटरने केलेली आहे.
आज रविवारी सर्व पुरावे नष्ट करण्यासाठी युद्ध पातळीवर साफसफाई झाली. परंतु, सातारा जिल्हा परिषदेच्या प्रिंटिंग प्रेस ला लटकत असलेल्या वेली तशाच लटकत आहेत. याबाबत आता सातारा जिल्हा परिषदेने खुलासा करण्याचे धाडस दाखवावे. अन्यथा वन विभागाच्या कामात कुचराई केल्याबद्दल त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यासाठी न्यायालयात याचिका दाखल व्हावी यासाठी विरोधी पक्षाने पुढाकार घेतला तर खऱ्या अर्थाने सातारा जिल्ह्यात लोकशाही असेल असे ज्येष्ठ वृक्ष प्रेमींनी सांगितले.