छ.संभाजीनगर:-(खुलताबाद)-शहरातील नवीन पाईपलाईन साठी रस्ते खोदकाम केलेले रस्ते पूर्ववत करणे: वीरेंद्र वाघ यांची मागणी.
पत्रकार ज्ञानेश्वर सोमासे गंगापूर

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
पत्रकार ज्ञानेश्वर सोमासे गंगापूर
RPS STAR NEWS
शहरातील नवीन पाईपलाईन साठी रस्ते खोदकाम केलेले रस्ते पूर्ववत करणे: वीरेंद्र वाघ यांची मागणी.
खुलताबाद निवेदनात म्हटले आहे की शहरात नवीन पाईपलाईन करण्यासाठी मे पटेल कन्ट्रक्शन मार्फत कामाला सुरुवात करण्यात आली आहे यासाठी कंपनीमार्फत गावात जेसीबीने खोदकाम करण्यात आले आहे त्यामुळे रस्त्याचे त्यांनी व्यवस्थित जशाचे तसे काम करत नाही त्यामुळे नागरिकांना ये जा करण्यास मोठी कसरत करण्यात येत आहे म्हणून झालेल्या रस्त्याचे अंदाजपत्रक प्रमाणे रस्ते पूर्ववत जसेच्या तसे दुरुस्ती करून द्यावी व सध्याचे झालेले चिखलाचे रस्ते व्यवस्थित तात्काळ करावी तसेच गट्टू असलेले रोडचे खोदकाम करताना गट्टू व्यवस्थित काढून एका जागी जमा करावे व नंतर खोदकामात सुरुवात करावी अन्यथा नगरपालिका कार्यालयासमोर आंदोलन करण्यात येईल असा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.
फोटो कॅप्शन नगरपालिका मुख्याधिकारी विक्रम दराडे यांना निवेदन देताना सामाजिक कार्यकर्ते वीरेंद्र वाघ व सुदाम सोनटक्के.