वैजापूर:-महालगाव येथे मुलींना मोफत पासचे वाटप.
पत्रकार बाळासाहेब सरोदे मराठवाडा संघटक

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483

RPS STAR NEWS ( माहिती आणि प्रसारण मंत्रालय दिल्ली नोंदणीकृत )
महालगाव येथे मुलींना मोफत पासचे वाटप.

वैजापुर—प्रतिनिधी
पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर मोफत पास योजने अंतर्गत मुलींना पास वाटप करण्यात आले.
महालगाव (ता. वैजापुर) येथील मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळ संचलित न्यू हायस्कूलमध्ये “एसटी पास थेट तुमच्या शाळेत ” या योजने अंतर्गत प्रशालेतील मुलींना मोफत पास योजनेचे पास वाटप करण्यात आले या वेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रशालेचे मुख्याध्यापक जे. बी. नारळे हे होते तर वैजापुर आगाराचे वरिष्ठ लिपीक आजिनाथ मुळे यांची व्यासपीठावर प्रमुख उपस्थिती होती. प्रशालेत बाहेरगावाहून येणाऱ्या वाघलगाव, सिरसगाव, चिंचडगाव, भगूर फाटा येथील ५५ मुलींना पासचे वितरण यावेळी करण्यात आले .तर प्रवासादरम्यानच्या अनेक समस्या यावेळी सहायक वाहतुक अधिक्षक गोपाल पगारे यांच्या समोर विद्यार्थीनींनी मांडल्यानंतर मुलींची गैरसोय होऊ नये म्हणून आणि त्यांचे शैक्षणिक हित लक्षात घेता शालेय वेळे अगोदर आणि शाळा सुटल्यानंतर स्वतंत्र बस सुरु करण्यात येईल तसेच अकोली वाडगाव, चौदा मैल येथील विद्यार्थ्यांसाठीही नविन बस सुरु करण्या संदर्भात विचार करून लवकरच अकोली वाडगाव या मार्गाची पाहणी केली जाईल. तसेच त्यांना पास उपलब्ध करुन देण्यात येतील आणि अकोलीवाडगाव येथील मुलांची होणारी गैरसोय टाळण्यात येईल असे आश्वासन यावेळी स. वा. अ. पगारे यांनी दिले तसेच जास्तीत जास्त मुलीनी मोफत पास योजनेचा लाभ घेण्याचे आवाहनही त्यांनी यावेळी केले याप्रसंगी प्रशालेचे मुख्याध्यापक जे. बी. नारळे यांनी प्रशालेच्यावतीने स्वतंत्र बसची मागणी करणारे निवेदनही मान्यवरांना दिले. याप्रसंगी प्रशालेतील सर्व शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी, विद्यार्थी यांची उपस्थिती होती.




