कराड:- पारंपरिक शिवजयंतीच्या मिरवणुकीने फेडले डोळ्यांचे पारणे
प्रतिनिधि:- शुभम पावणे कराड

कऱ्हाड : पारंपरिक शिवजयंतीच्या मिरवणुकीने फेडले डोळ्यांचे पारणे
कऱ्हाड : छत्रपती शिवाजी महाराज की जय…, तुमचं आमचं नातं काय… जय भवानी जय शिवराय, जय भवानी… जय शिवाजी, कसलं वादळ… भगवं वादळ… या ना अशा घोषणांनी सारे कऱ्हाड शहर आज दणाणुन गेले. निमीत्त होते पारंपारीक शिवजयंतीनिमीत्त शहरातुन घोडे, चित्ररथ, वाद्ये, तुताऱ्यांच्या ललकारीत महिला, नागरीक, युवक, युवतींच्या उपस्थितीत दिमाखात काढण्यात आलेल्या भव्य मिरवणुकीचे.
शहरात दरवर्षी पारंपारीक शिवजयंती दिमाखात साजही केली जाते. कोरोना नंतर दोन वर्षांनी होत असलेल्या यंदाच्या मिरवणुकीत तरुणांचा मोठा जोश दिसुन आला. येथील पांढरीच्या मारुती मंदिरापासुन सायंकाळी सातनंतर मिरवणुकीस पालखी पुजनाने हिंदु एकता आंदोलनाचे विनायक पावसकर, विक्रम पावसकर, अतुल भोसले, सौरभ पाटील, जयवंत पाटील, अतुल शिंदे, हणमंतराव पवार, विद्या पावसकर, स्मिता हुलवान, मुकुंद चरेगावकर, फारुख पटवेकर, मजहर कागदी यांच्यासह माजी नगरसेवक व मान्यवरांच्या उपस्थितीत प्रारंभ झाला. मिरवणुकीत पारंपारीक वेशभुषा परिधान करुन घोड्यावर स्वार झाले.