गंगापूर:-दिवशी पिंपळगाव येथील ऐतिहासिक भारतमाता मंदीर रस्त्याच्या कामाला आमदार सतिश चव्हाण यांच्या वैयक्तिक निधीतून सुरूवात.
पत्रकार ज्ञानेश्वर सोमासे गंगापूर

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
पत्रकार ज्ञानेश्वर सोमासे गंगापूर
RPS STAR NEWS
दिवशी पिंपळगाव येथील ऐतिहासिक भारतमाता मंदीर रस्त्याच्या कामाला आमदार सतिश चव्हाण यांच्या वैयक्तिक निधीतून सुरूवात.
दिवशी पिंपळगाव ता.गंगापुर येथे मराठवाडा मुक्ती संग्रामाच्या ऐतिहासिक लढ्याचे साक्षीदार असलेले भारतमाता मंदिराची जिल्हा अधिकारी कार्यालयात नोंद आहे.परंतु सामजिक वनीकरणाच्या हद्दीत असल्याने त्याकडे अनेक वर्षे प्रशासनाकडून दुर्लक्षित असल्याने गावकऱ्यांच्या वतिने जिर्णोद्धार करण्यात आला होता.परंतु ऐतिहासिक वास्तू कडे स्थानिक लोकप्रतिनिधींनी सुद्धा दुर्लक्ष केल्याने गावकरी व भाविकांना दर्शनाला जाण्यासाठी पावसाळ्यात चिखलातून वाट काढावी लागत असल्याची बाब आमदार सतिश चव्हाण यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी लगेच वैयक्तिक निधीतून कामाला सुरूवात केली आहे.
यावेळी तंटामुक्ती अध्यक्ष राधाकृष्ण गुजर,ग्रामपंचायत सदस्य मिनाक्षी थोरात,रतन बडुगे,ग्रामपंचायत सदस्य पती अशोक सोनवणे,बाळु वावरे,प्रविण आधाने,पंकज नन्नवरे,गणेश वावरे,मोहन बडुगे,कडु चंदिले,प्रभु बडुगे यांची उपस्थिती होती.