कोरेगाव:-श्री गाडगे महाराज आश्रमशाळा ब्रह्मपुरी येथे शिक्षण सप्ताह अंतर्गत क्रीडा दिनाचे आयोजन.
पत्रकार आकाश जाधव खटाव तालुका उपाध्यक्ष

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
पत्रकार आकाश जाधव खटाव तालुका उपाध्यक्ष
RPS STAR NEWS
श्री गाडगे महाराज आश्रमशाळा ब्रह्मपुरी येथे शिक्षण सप्ताह अंतर्गत क्रीडा दिनाचे आयोजन.
आजच्या क्रीडा दिनाची सुरुवात क्रीडा प्रतिज्ञेने करण्यात आली.
विद्यार्थ्यांना देशी खेळाची आवड निर्माण व्हावी, त्यांच्यामध्ये खेळाडूवृत्ती वृद्धिंगत व्हावी या उद्देशाने आज शिक्षण सप्ताह अंतर्गत क्रीडा दिनाचे आयोजन करण्यात आले होते.
विद्यार्थ्यांसाठी लगोरी, बुद्धिबळ, सागरगोटे, दोरउड्या, काचकवड्या, जीपकली, लिंबू चमचा शर्यत, तीन पायाची शर्यत यासारखे देशी खेळाचे आयोजन करण्यात आले.
दरम्यान हॉकीचे जादूगार मेजर ध्यानचंद यांच्या विषयी माहितीपर व्हिडिओ, विविध देशी मनोरंजक खेळाची माहिती, भारताने क्रिकेटमध्ये विश्वचषक जिंकल्याचा प्रसंग प्रोजेक्टर च्या सहाय्याने दाखवण्यात आला.
श्री.संतोष जाधव सर यांनी क्रीडा दिनाच्या आयोजनाचा उद्देश सांगितला.
कार्यक्रम यशस्वीतेसाठी मुख्याध्यापक सौ. भारती मोहिते मॅडम , श्री.रवींद्रनाथ मोहिते सर श्री.रमेश घोलप सर यांनी परिश्रम घेतले.
यावेळी प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक श्री दीपक माने सर, सर्व शिक्षक ,शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी विद्यार्थिनी उपस्थित होते.