आरोग्य व शिक्षणताज्या घडामोडीदेश विदेशराजकीय

सातारा:-पिंपोडे बुद्रुक- यू एन एफ’ जागतिक फेलोशिपवर यंदा मराठी मुलीचे नाव..

प्रतिनिधी अभिजीत लेंबे:-9822883516

मुख्य संपादक प्रल्हाद चव्हाण:-8208717483.

‘यू एन एफ’ जागतिक फेलोशिपवर यंदा मराठी मुलीचे नाव..

पिंपोडे बुद्रुक/प्रतिनिधी/अभिजीत लेंभे

सातारा मधील पिंपोडे बु ची मयुरी धुमाळ उत्तीर्ण, जगभरातून केवळ ७ जणांची निवड.

जागतिक स्तरावर महत्वाच्या मानल्या जाणाऱ्या ‘युनायटेड नेशन फाऊंडेशन’च्या डेटा व्हॅल्यू अ‍ॅडव्होकेट फेलोशिपवर यंदा मराठी मुलीने नाव कोरले आहे. जगभरातून निवडलेल्या सात अभ्यासकांमध्ये भारतातून मयुरी धुमाळ हिची निवड झाली आहे. विशेष म्हणजे आशिया खंडातून ही एकमेव विद्यार्थिनी म्हणून प्रतिनिधित्व करणार आहे.

सामाजिक कार्यातून विकास साधण्याच्या ‘युनायटेड नेशन्स फाऊंडेशन’च्या कार्यात माहिती संकलनाचा मोठा वाटा असतो. याचसाठी त्यांच्याकडून “डेटा व्हॅल्यूज” हा माहिती संकलन कार्याची फेलोशिप दिली जाते. यासाठी सामाजिक कार्यात सक्रिय असणारे जगभरातून केवळ ७ अभ्यासक निवडले जातात.

यंदा जगभरातून ६५ हून अधिक देशांमधून सुमारे ४०० उमेदवारांनी अर्ज केले होते. त्यातून निवडलेल्या सात अभ्यासकांमध्ये मयुरीने बाजी मारली आहे.

“डेटा व्हॅल्यूज” ही मोहीम तळागाळातील सामाजिक समस्यांचा अभ्यास करते. ही एक जागतिक चळवळ असून ज्यामध्ये 60 पेक्षा जास्त देशांतील शेकडो लोकांचा समावेश आहे. विशेष म्हणजे अधिक न्याय्य आणि निर्भेळ माहितीचा साठा करण्याचे काम या अंतर्गत केले जाते.

सप्टेंबर २०२२ मध्ये युनायटेड नेशन्स जनरल असेंब्लीमध्ये सुरू करण्यात आलेली ही मोहीम अर्ध दशलक्षाहून अधिक लोकांपर्यंत पोहोचली आहे. पुढील वर्षभरात, हे अभ्यासक “डेटा व्व्हॅल्यू” मोहिमेचे नेतृत्व करतील, आणि इतरांना, विशेषत: उपेक्षित समुदायातील लोकांना, माहिती संकलन कसं उपयुक्त आहे आणि त्याचा अयोग्य वापर कसा थांबवला पाहिजे हे पटवून देणार आहेत.साधारण वर्षभरासाठी ही फेलोशीप देण्यात आली आहे.

मयुरी सध्या नाशिकमध्ये “शोधिनी- Action Research” या प्रोजेक्टवर काम करत असून हे काम करताना समाजातील अनेक घटकांची, समस्यांची अचूक माहिती आपल्याकडे असणे किती महत्वाचे आहे याचा ती स्वतः अनुभव घेत आहे. मयुरीच्या मते रिसर्च, अभ्यास हे ठराविक वर्गाची मक्तेदारी आहे असा एक समज असतो. पण त्यामुळे तळागाळातील लोकांचे प्रश्न, त्यांची मतं, त्यांच्याकडचं ज्ञान दुर्लक्षित राहतं. डेटा वॅल्यूज प्रोजेक्ट तळागाळातलं ज्ञान, लोकसहभाग आणि डेटावर सामान्यांचा अधिकार यासाठी काम करतंय हे समजल्यावर इंटरेस्ट वाटला आणि कुठेतरी जे म्हणायचंय ते पोहचवण्यासाठी ही संधी चालून आली असल्याचं तिला वाटतं. समाजातील उपेक्षित वर्गाच्या हाल अपेष्ठा सक्षमपणे मांडण्याचे कौशल्य असल्याने प्रक्रियेत सहभागी होताना डेटा आणि सामाजिक प्रश्नांविषयीची मतं मांडली, आज सरकारी रिपोर्ट आणि प्रत्यक्ष परिस्थिती यातली तफावत समजत असल्याने त्या माहितीचा योग्य वापर व्हावा म्हणून वाटणारी तळमळ पोचवली म्हणून निवड झाल्याचे मयुरी सांगते. जागतिक स्तरावर पोहचून असं काम करायला मिळणार आहे जिथे खरी माहिती, लोकांची मतं, सत्य परिस्थिती याला महत्त्व असणार आहे याचा आनंद जास्त वाटतो.

युनायटेड नेशन फाऊंडेशनची डेटा वॅल्यू अ‍ॅडव्होकेट ही फेलोशिप आहे. यात जगभरातून 7 जणांची निवड झाली आहे. शाश्वत विकासाची ध्येय पूर्ण करताना माहितीचा योग्य आणि न्याय्य वापर व्हावा म्हणून डेटा वॅल्यूज हा प्रोजेक्ट काम करतो. अनेक ठिकाणी माहिती लपवली जाते, आकडेवारी खोटी असते, त्यामुळे विविध योजना जागतिक पॉलिसी यांचा योग्य तो परिणाम साधला जात नाही. आणि हे बदलण्यासाठी जगभरातून सात लोकांची निवड केली गेली आहे.

अशी असते निवड प्रक्रिया…
जगभरातून अर्ज मागवले जातात. त्यानंतर या अर्जांची छाननी करून तीन टप्प्यांत निवड प्रक्रिया केली जाते. अर्जात तुम्हाला डेटाचं सामाजिक महत्त्व किती आहे. याविषयी चाचपणी केली गेली. त्यातून निवडलेल्या लोकांसाठी एक लहान ऑनलाईन परीक्षा झाली. ज्यामध्ये दोन प्रश्नांवर उत्तराचा एक व्हिडिओ बनवून पाठवायचा असतो. व्हिडीओ ग्राह्य धरल्यास मुख्य मुलाखतीसाठी निवड करण्यात येते. त्यानंतर ऑनलाईन मुलाखत झाल्यानंतर अंतिम निवड करण्यात येते. अशा पद्धतीने अनेक अडथळे पार करून डेटा किती चांगल्याप्रकारे समाजातील उपेक्षित घटकांसाठी वापरता येईल, या बाबी पटवून देणं महत्वाचं ठरतं.

शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button