छ.संभाजीनगर:-राजपूत भामटा प्रतिष्ठान तर्फे गुणवंत व यशवंत चा सत्कार सोहळा संपन्न….
पत्रकार ज्ञानेश्वर सोमासे गंगापूर

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
पत्रकार ज्ञानेश्वर सोमासे गंगापूर
RPS STAR NEWS
राजपूत भामटा प्रतिष्ठान तर्फे गुणवंत व यशवंत चा सत्कार सोहळा संपन्न….
छ.संभाजीनगर राजपूत भामटा प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने सहा जुलै रोजी सकाळी अकरा वाजता रुक्मणी हाल एमजीएम परिसर छत्रपती संभाजीनगर येथे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभाचा कार्यक्रम पार पडला.
यामध्ये दहावी बारावी नेट सीए उत्तीर्ण झालेले गुणवंत यूपीएससी एमपीएससी स्टाफ सिलेक्शन सामाजिक क्षेत्रातील उत्कृष्ट कार्य करणारे कृषी. क्रीडा .साहित्य. नोकरी क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करणारे कीर्तिवंतांचा सत्कारा करण्यात आले यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून
जी श्रीकांत महानगरपालिका आयुक्त नवनीत कावत पोलीस ऊपआयुक्त श्रीमती करुणा राजपूत न्यायाधीश अमरावती. खुशालसिंग परदेशी अप्पर जिल्हाधिकारी हिंगोली. प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
मान्यवराच्या हस्ते दीप प्रज्वलित करून व महापुरुषांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली अध्यक्ष तोताराम बहुरे हे होते
समाजातील मान्यवर डॉ .जीवन राजपूत.विश्वनाथ राजपूत , कवरसिंग बैनाडे, देवचंद बारवाल, जयसिग खोकड राजपुत.,पद्दम राजपूत प्रत्रकार मंगल सिंग सिंगल.धरमसिग बिमरोट आदींसह समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
प्रतिष्ठांचे अध्यक्ष तोताराम बहुरे भागवत बिघोत, जयलाल नागलोत, बिजू मारग, युवराज बहुरे , ताराचंद महेर, प्रताप महेर,प्रा.भिमसिंग कहाटे आदिनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विशेष परिश्रम घेतले
कार्यक्रमाचे सूत्रसंचालक सुभाष महेर व महेंद्रसिंग बारवाल यांनी केली.
तर आभार प्रदर्शन प्रा.भगवान डोभाळ यांनी मानले व कार्यक्रमाचे सांगता राष्ट्रगीतांनी करण्यात आली.