सातारा:-संबोधी प्रतिष्ठानच्या व्याख्यानमालेत साहित्यिक डॉ. दीपा व डॉ. रवींद्र श्रावस्ती यांचा सत्कार करताना रमेश इंजे, सोबत प्रा.प्रशांत साळवे.
ज्येष्ठ पत्रकार अजित जगताप

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483

संबोधी प्रतिष्ठानच्या व्याख्यानमालेत साहित्यिक डॉ. दीपा व डॉ. रवींद्र श्रावस्ती यांचा सत्कार करताना रमेश इंजे, सोबत प्रा.प्रशांत साळवे.

बुद्ध फुले आंबेडकर स्त्रियांचे खरे मुक्तीदाते
– डॉ.दीपा श्रावस्ती
सातारा-बुद्ध,फुले,आंबेडकर,पेरियार हे स्त्रियांचे खरे मुक्तिदाते आहेत. या महामानवांचा वारसा जपण्याची गरज आहे, असे मत लेखक, संशोधक डॉ. दीपा श्रावस्ती (सांगली ) यांनी केले.
संबोधी प्रतिष्ठानच्या वतीने ‘ मी आणि माझे लेखन ‘ या विषय सूत्रावर आयोजित करण्यात आलेल्या ३९ व्या वर्षातील थोरांच्या स्मृती व्याख्यानमालेत त्या बोलत होत्या. अध्यक्षस्थानी ज्येष्ठ साहित्यिक डॉ. रवींद्र श्रावस्ती होते. विचारमंचावर संबोधी प्रतिष्ठानचे अध्यक्ष रमेश इंजे, उपाध्यक्ष प्राध्यापक प्रशांत साळवे उपस्थित होते.
डॉ. दीपा श्रावस्ती म्हणाल्या, बुद्ध वगळता जगातील सर्वच धर्म संस्थापकांनी स्त्रीला दुय्यम लेखले आहे. खरा स्त्रीवाद बुद्धाने जोपासला आहे. तेच स्त्रीवादाचे मूळ जनक आहेत. पितृसत्ताक व्यवस्थेने जात व लिंगभाव जोपासला असून स्त्रीला गुलाम केले आहे. आजही माणसाच्या मनात ‘ मनू ‘ दबा धरून बसला आहे. ही व्यवस्था बदलण्यासाठी,स्त्री-पुरुष समता प्रस्थापित करण्यासाठी जातीअंताकडे जाण्याची गरज आहे.
मी चळवळीच्या गरजेतून परिवर्तनाचे शस्त्र म्हणून लेखन केलं आहे. मला माझ्या वैचारिक साहित्य निर्मिती प्रक्रियेने मनस्वी आनंद दिला आहे.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक संबोधी प्रतिष्ठानचे अध्यक्ष रमेश इंजे यांनी केले. सूत्रसंचालन व पाहुण्यांचा परिचय प्रा. प्रशांत साळवे यांनी करून दिला. सहकार्यवाह डॉ. सुवर्णा यादव यांनी आभार मानले. संबोधी प्रतिष्ठानचे संघटक दिनकर झिंब्रे, कोषाध्यक्ष यशपाल बनसोडे तसेच प्रतिष्ठानचे विश्वस्त व विविध क्षेत्रातील मान्यवर कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.




