भुईंज:-(भीमनगर)-नेतृत्व विकास कार्यशाळा ( Leadership Training for Dignity Center Participants )
पत्रकार मारुती सोमुत्ते पुणे जिल्हा उपाध्यक्ष

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
पत्रकार मारुती सोमुत्ते पुणे जिल्हा उपाध्यक्ष
RPS STAR NEWS
नेतृत्व विकास कार्यशाळा
( Leadership Training for Dignity Center Participants )
दिनांक :- २१ जुलै २०२४
ठिकाण :- भुईंज (भीमनगर)
सहभागी :- ६१
निर्माण बहुउद्देशीय विकास संस्था निर्भया प्रकल्पच्या माध्यमातून नेतृत्व विकास कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले.
कार्यक्रमाची सुरुवात प्रमुख पाहुण्यांच्या स्वागतांने केली. कार्यशाळेसाठी प्रमुख पाहुणे म्हणून लाभलेले परिवर्तन संस्थेचे मा. किशोर काळोखे सर, भुईंज ग्रामपंचायत सदस्य नंदा कांबळे मॅडम यांचे स्वागत भुईंज मधील बालिका पंचायत गटातील मुली व सन्मान केंद्रातील मुले यांनी स्वागत गीत गाऊन केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन निर्माण संस्थेचे सुचिता सातपुते यांनी केले व रमेश पुजारी यांनी निर्माण संस्थेबद्दलची माहिती व कार्यशाळेचे प्रास्ताविक केले.
सदरची कार्यशाळा एकूण दोन सत्रांमध्ये पार पडली. पहिल्या सत्रांमध्ये मुलांनी शक्ती दे, मुक्ती दे अमुच्या मना….ही प्रार्थना म्हणाली. नेतृत्व करण्यासाठी दिशा, दिशा देणारा, नेता, लीडर, निर्भय, पुढाकार घेणारा, चांगले व्यक्तिमत्व गुण, निर्णय क्षमता, संवाद कौशल्य, व्यक्तिमत्व विकास, शारीरिक तंदुरुस्ती, मानसिक स्थैर्य, देहबोली, चेहऱ्यावरील हावभाव, सुसंवाद साधणे, संभाषण कला इ. विषयावर मार्गदर्शन केले.
दुसऱ्या सत्रात आज *गुरुपौर्णिमा* निमित्त काही मुलींनी भाषण केले. तसेच खेळाच्या माध्यमातून गट विभागणी करून प्रत्येक गटाला शाळेतील नैतिक मूल्ये, कला, कौशल्ये याचे गटकार्य दिले व सादरीकरण घेण्यात आले. मुलींना चेतना देण्यासाठी किशोर काळोखे सरांनी वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटीज घेऊन मुलांना प्रोत्साहन देण्याचे काम केले. दिवसभर झालेल्या कार्यशाळेचा आढावा घेण्यात आला. यामध्ये सहभागी मुलींनी उत्तम रित्या शिकलेल्या, समजलेल्या गोष्टी सर्वांसमोर मांडल्या. तसेच विद्या गडकरी यांनी उपस्थित मान्यवरांचे आभार मानले.
सदरच्या कार्यशाळेत भुईंज विभागामधील बेलमाची, भिरडाचिवाडी, सायगाव, माहिगाव, सरताळे, अमृतवाडी, भुईंज भीमनगर, समतानगर इ. ८ पेक्षा जास्त गावातील बालिका पंचायत गटातील मुली व सन्मान केंद्रातील मुले उपस्थित होते.
सदरच्या कार्यशाळेसाठी निर्माण संस्थेचे रमेश पुजारी, सुचिता सातपुते, चांदणी चंदनशीवे, विद्या गडकरी उपस्थित होते.