क्रीडा व मनोरंजनताज्या घडामोडीमहाराष्ट्र

मुंबई :- जी एम ई म्युझिक रेकॉर्ड लेबल प्रस्तुत नवं गाण प्रदर्शित, सोशल मीडियावर गाण तुफान व्हायरल!

पत्रकार कुंदा भोपी महाराष्ट्र राज्य महिला उपाध्यक्ष 

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483

 पत्रकार कुंदा भोपी महाराष्ट्र राज्य महिला उपाध्यक्ष

RPS STAR NEWS

मुंबई :-

जी एम ई म्युझिक रेकॉर्ड लेबल प्रस्तुत नवं गाण प्रदर्शित, सोशल मीडियावर गाण तुफान व्हायरल!

 

जी एम ई म्युझिक आणि संगीतकार सनी महादेव घेऊन आले आहेत नविन ट्रेंडिग गाणं!

सोशल मीडियावर होणार फक्त तात्यांची चर्चा, जी एम ई म्युझिकवर ‘तात्या सोडाना’ गाण प्रदर्शित.

मराठी संगीत इंडस्ट्रीमध्ये नवनवीन गाणी व्हायरल होताना दिसत आहेत. त्यात तात्यांचे व्हिडाओ व्हायरल होताना दिसत आहेत.ते तात्या नेमके कोण ? याचा खुलासा झाला आहे. जी एम ई म्युझिक रेकॉर्ड लेबल ‘तात्या सोडाना’ हे भन्नाट कॉमेडी तसेच डान्सीकल गाणं प्रेक्षकांसाठी घेऊन आले आहेत. सध्या सोशल मीडियावर या गाण्याची सर्वत्र चर्चा होताना दिसत आहे. या गाण्याचे गीतकार आणि संगीतकार हे सनी महादेव आहेत. अण्णा भंडारी आणि श्रावणी काळे हे कलाकार या गाण्यात आहेत. तर हे गाणं गायिका वैष्णवी आदोडे हीने गायले असून या गाण्यातील रॅप सनी महादेव याने गायलं आहे. शिवाय अविनाश नलावडे हे या गाण्याचे नृत्यदिग्दर्शक आहेत. जी एम ई म्युझिकवर या आधी गुलाबी साडी फेम संजू राठोडने गायलेली ‘कायमचा सिंगल आणि मुखडा’ ही दोन गाणी तुफान व्हायरल झाली होती. या गाण्यांना मिलीयन्स व्ह्यूजपेक्षा अधिक लोकांनी पाहिले आहे.

या गाण्याचे संगीतकार, गीतकार सनी महादेव गाण्याविषयी सांगतात, “महाराष्ट्रात तात्या नावाने अनेक रील्स व्हायरल होत होत्या. युवकांमध्ये या शब्दाला घेऊन अनेक कॉमेडी व्हिडीओ बनवण्यात आले. एक संगीतकार म्हणून मला तात्या या शब्दाला घेऊन एक कथानक सुचलं आणि मी ते गाण्याच्या माध्यमातून लोकांपर्यंत आणण्याचा प्रयत्न केला. आणि अश्याप्रकारे मला या गाण्याची संकल्पना सुचली. मला खात्री आहे की महाराष्ट्रातील प्रेक्षकांना हे गाणं नक्की आवडेल.”

पुढे ते सांगतात, “हे गाणं रेकॉर्डींग स्टुडिओत बनवताना आमच्यासमोर खूप मोठ चॅलेंज होतं. कारण बालवयापासून वृद्धांपर्यंत सगळ्यांनीच हे गाण ऐकावं यासाठी आम्ही प्रयत्न करत होतो. कारण हे गाणं अडल्टनेसकडे न जाता सौम्यपद्धतीने मांडलं. गायिका वैष्णवी आदोडे हीने सुंदर पद्धतीने हे गाण गायलं आहे. तसेच या गाण्याच्या पोस्ट प्रोडक्शनची जबाबदारी एन डी ९ स्टुडिओकडे होती. या गाण्याचे चित्रीकरण पुण्यातील एअरपोर्ट नजीक झाले आहे.”

ACLS TIMES” YOUTUBE चॅनेल ला LIKE SUBSCRIBE आणि COMMENT करा. 🙏

ACLS इंटरनॅशनल प्रेस रिपोर्टर असोसिएशन

शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button