आरोग्य व शिक्षणताज्या घडामोडीमहाराष्ट्र

पुसेसावळी:-(खटाव)-राहुल सावंत इंग्लिश मिडियम स्कूलच्या विद्यार्थ्यांकडून पालखी सोहळा साजरा.

पत्रकार विनोद पाटील सातारा जिल्हाध्यक्ष 

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483

 पत्रकार विनोद पाटील सातारा जिल्हाध्यक्ष

RPS STAR NEWS

राहुल सावंत इंग्लिश मिडियम स्कूलच्या विद्यार्थ्यांकडून पालखी सोहळा साजरा.

पुसेसावळी:-(खटाव)-  पुसेसावळी येथील राहुल सावंत इंग्लिश मीडियम स्कूल पुसेसावळी (थोरवेवाडी) तर्फे आर्वी ता. कोरेगाव मध्ये पालखी सोहळा उत्साहात साजरा करण्यात आला.

राहुल सावंत इंग्लिश मीडियम स्कूल मध्ये शालेय उपक्रमा बरोबरच सहशालेय उपक्रमही राबविण्यात येतात. भारतीय संस्कृतीचे महत्त्व अनन्य साधारण आहे, त्याचे पालन विद्यार्थ्यांनी करावे यासाठी या पालखी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. महाराष्ट्रात आषाढी वारी देहू,आळंदी आशा अनेक दिंड्या पंढरपूर येथे विठ्ठलाच्या भेटीला जातात.हा सोहळा खूपच अभूतपूर्व असतो आणि असा सोहळा आपल्या विद्यार्थ्यांनाही माहिती व्हावा या उद्देशाने शाळेमध्ये पालखी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.
हा पालखी सोहळा आर्वी येथे अतिशय भक्तिमय वातावरणात पार पडला सोहळ्याचे औचित्य साधून मुलांनी वारकरी वेशभूषा केली होती. वातावरण जणू विठ्ठल भक्तीतमय होते. यावेळी विद्यार्थ्यांनी माऊलीचा गजर या गीतांवर नृत्य सादर केले व माऊली माऊली या गजराने सारा परिसर दुमदुमून गेला होता. पालखी सोहळ्यातून मुलांच्या अंगी शिस्तबद्धता प्रेमभावना जागृत होण्यास मदत झाली. या पालखी सोहळ्याच्या नीटनेटक्या आयोजनासाठी शाळेचे मुख्याध्यापक श्री. हणमंत ठोंबरे व शाळेच्या पर्यवेक्षिका सौ. कविता कदम यांच्या मार्गदर्शन लाभले व गाव प्रदक्षिणा घेत विद्यार्थ्यांनी विठू नामाचा गजर केला.
तसेच सांस्कृतिक विभाग प्रमुख श्री. राहुल जाधव यांनी दिंडीचे सुंदर नियोजन केले या सोहळ्यासाठी आर्वी गावचे पंचायत समिती सदस्य मा. विकास राऊत, श्रीधर वाघमारे मा. चेअरमन विकास सेवा सोसायटी, सौ. मीराबाई जगदाळे व्हा. चेअरमन विकास सेवा सोसायटी व सेवानिवृत्त मुख्याध्यापक आर्वी श्री.मधुकर जाधव सर उपस्थित होते. माननीय विकास राऊत यांच्या हस्ते पालखीचे पूजन करण्यात आले.
यावेळी उपस्थित सर्व मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. शाळेचे मुख्याध्यापक श्री. हणमंत ठोंबरे सरांनी आभार मानले व कार्यक्रम संपला असे जाहीर केले.

ACLS TIMES” YOUTUBE चॅनेल ला LIKE SUBSCRIBE आणि COMMENT करा. 🙏

ACLS इंटरनॅशनल प्रेस रिपोर्टर असोसिएशन

शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button