श्रीरामपूर:-टाकळीभान कबड्डी संघावर कर्जतमध्ये अन्याय झाल्याची ग्रामस्थांनी भावना ! रस्तारोकोचा इशारा …..
पत्रकार संजय पगारे श्रीरामपूर तालुका अध्यक्ष

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
माहिती आणि प्रसारण मंत्रालय दिल्ली नोंदणीकृत
टाकळीभान कबड्डी संघावर कर्जतमध्ये अन्याय झाल्याची ग्रामस्थांनी भावना ! रस्तारोकोचा इशारा …..

श्रीरामपुर ( प्रतिनिधी ) याबाबत अधिक माहिती अशी की १७ वर्ष शालेय जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धा २०२५ हि समर्थ माध्यमिक विद्यालय कर्जत या ठिकाणी झाली . याचा फायनल सामना १ ) न्यु इंग्लिश स्कूल व आण्णासाहेब पा पटारे कनिष्ठ महा विद्या टाकळीभान विरुद्ध
२) समर्थ माधमिक विद्यालय कर्जत असा झाला
गुणफलक
१) टाकळीभान संघ – 23 गुण
२) कर्जत संघ – 21 गुण
अशा स्थितीत सामना सुरू असताना कर्जत संघातील खेळाडूची टाकाळी भात संघाने पकड केली . आपण सामना हारणार अस चित्र लक्ष्यात आल्याने समोरील संघाच्या बाहेरील लोकांनी यामध्ये कैलास जगदाळे व त्यांच्या सोबत आहेल्या लोकांनी खेळाडूंना जबर मारहाण केली यात दोन खेळाडू गंभीर जखमी झाले असा आरोप टाकळीभान कबड्डी पटू व ग्रामस्थांनी केला आहे अश्या परिस्थितीत इतर खेळाडू धास्तावले व मानसिक दृष्ट्या खचले पुढे सामना इथे खेळलो तर आपल्याला पुन्हा मारतील या भीतीने मुलं धास्तावले म्हणून क्रीडा शिक्षण व पालकांनी सदर सामना जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय . अहिल्यानगर येथे खेळविण्यात यावी असा अर्ज आयोजकांनी व तेथील स्थानिक क्रीडा अधिकारी भाऊराव वीर यांना दिले परंतु त्यांनी सामना तिथे खेळवत धोक्याचं होत म्हणून वारंवार सामना जिल्हा क्रीड अधिकारी कार्यालय . अहिल्यानगर येथे खेळवण्यास त्यांनी विरोध केला व टाकळीभान संघ २ जुणांनी आघाडीवर असतानाही अधिकाऱ्यांनी मनमानी व अधिकाराचा गैरवापर करत टाकळीभान संघ बाद करून कर्जत संघ विजयी घोषित केला देखील आरोप त्यांनी केला आहे या प्रकारामुळे चांगल्या गुणवंत खेळाडूंवर अन्याय करण्याचे काम त्यांनी केले म्हणून त्याची तक्रार कर्जत पोलिस स्टेशन येथे देखील देण्यात आल्याची माहिती त्यांनी तरी खेळाडूंचे नुकसान होऊ नये म्हणून यात जिल्हा क्रीडा अधिकारी ज्ञानेश्वर खुरंगे यांनी लक्ष घालून खेळाडूंना न्याय देऊन सदरील सामना पुन्हा जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय अहिल्यानगर येथे खेळवण्यात द्यावा अन्यथा खेळाडू व ग्रामस्थ यांनी राज्य मार्ग टाकवीभान येथे रस्ता रोको करण्याचा इशारा दिला आहे.




