ताज्या घडामोडी

शिरूर:-रूबी हॉल क्लिनिक तर्फे शिरूर तालुक्यातील पहिल्या कॅथ लॅबचे उद्घाटन.

पत्रकार प्रदीप भोरा शिरूर तालुका संघटक

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483

 पत्रकार प्रदीप भोरा शिरूर तालुका संघटक

RPS STAR NEWS

रूबी हॉल क्लिनिक तर्फे शिरूर तालुक्यातील पहिल्या कॅथ लॅबचे उद्घाटन.

फियाट इंडिया ऑटोमोबाईल्स प्रा.लि.च्या सहकार्याने महत्त्वपूर्ण सीएसआर उपक्रम.

शिरूर,27 सप्टेंबर 2024 : रूबी हॉल क्लिनिक तर्फे शिरूर तालुक्यातील आपल्या पहिल्या कॅथ लॅबचे उद्घाटन करण्यात आले आहे. मातोश्री मदनबाई धारिवाल हॉस्पिटलच्या कार्डियाक सेंटरमध्ये 26 सप्टेंबर 2024 रोजी सुरू करण्यात आलेली ही अत्याधुनिक सुविधा टाटा मोटर्स आणि स्टेलांटिसचा संयुक्त सहयोग असलेल्या फियाट इंडिया ऑटोमोबाईल्स प्रा.लि (एफआयएपीएल) आणि ग्रांट मेडिकल फाऊंडेशन (रूबी हॉल क्लिनिक) यांचा सहकार्यात्मक उपक्रम आहे. ही सुविधा म्हणजे शिरूर तालुक्यातील लोकांपर्यंत अद्ययावत हृदयरोग चिकित्सा पोहचविणे व त्याचबरोबर या भागात प्रतिबंधात्मक आरोग्याला प्रोत्साहन देण्याच्या दृष्टीने एक महत्त्वाचे पाऊल आहे. ही सुविधा सुरू होण्याबरोबरच शिरूरमध्ये पहिल्यांदाच कोरोनरी अँजिओग्राम (सीएजी) प्रक्रिया करण्यात आली असून स्थानिक समुदायासाठी आरोग्यसेवेतील हा महत्त्वाचा टप्पा आहे.

ही कॅथ लॅब सुरू होण्याआधी शिरूर तालुक्यातील रहिवाशांना प्रगत हृदयरोग उपचार मिळण्यात अनेक आव्हानांचा सामना करावा लागायचा. अँजिओग्राम,अँजिओप्लास्टी,पेसमेकर्सचे रोपण यासारख्या तातडीच्या हृदय प्रक्रियांसाठी पुणे किंवा इतर शहरांमध्ये जाण्याचा लांबचा प्रवास करावा लागायचा. गंभीर स्थितीतील उपचारांना विलंब झाल्यामुळे धोका अधिक बळावायचा. स्थानिक पातळीवर अद्ययावत सुविधा नसल्यामुळे उपचारासाठी जाण्यास लागणारे अंतर आणि आर्थिक भाराव्यतिरिक्त हृदयासंबंधित तातडीच्या परिस्थितीत चांगले परिणाम मिळण्यासाठी वेळेवर उपचार देखील प्राप्त व्हायचे नाही.मात्र आता निदान व हृदयरोग उपचाराशी संबंधित प्रक्रियांसाठी प्रगत सुविधा सुरू झाल्याने शिरूर तालुक्यातील रूग्णांना आपल्या घराजवळच जीवनदायी उपचार मिळू शकतात,ज्यामुळे संबंधित जोखीम कमी होऊन बरे होण्याचा कालावधी देखील कमी होईल.

या कॅथ लॅबचे उद्घाटन फियाट इंडिया ऑटोमोबाईल्स प्रा.लि.(एफआयएपीएल) चे वरिष्ठ उपाध्यक्ष राकेश बवेजा आणि रूबी हॉल क्लिनिकचे विश्वस्त व फिजिशियन डॉ.सायमन ग्रांट यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी समारंभाला रूबी हॉल क्लिनिकचे मुख्य कार्यकारी अधिकारी बेहराम खोडाईजी, इंटरव्हेंशनल कार्डिओलॉजिस्ट डॉ.सीएन मखळे ,स्ट्रॅटेजी व बिझनेस डेव्हलपमेंट विभागाच्या प्रमुख न्याटली ग्रांट आणि हृदयरोग तज्ञ डॉ.हर्षल इंगळे आदी मान्यवरांसह आरोग्यसेवा क्षेत्रातील व्यक्ती,स्थानिक समुदायातील लोक,पत्रकार उपस्थित होते.

या नवीन कॅथ लॅबच्या महत्त्वावर भर देत रूबी हॉल क्लिनिकचे विश्वस्त व फिजिशियन डॉ.सायमन ग्रांट म्हणाले की,ही नवीन कॅथ लॅब सुविधा म्हणजे आरोग्यसेवा पासून वंचित असलेल्या लोकांना उच्च दर्जाच्या आरोग्यसेवा पुरविण्याची आमची कटिबद्धता दर्शविते.या सुविधेमुळे शिरूर तालुक्यातील हृदयरोग चिकित्सेत सुधार होणार असून प्रतिबंधात्मक आरोग्यसेवेसाठी एक महत्त्वाचे साधन ठरणार आहे.त्याचबरोबर सक्रियपणे आरोग्य समस्या सोडविण्यास मदत होईल.

रूबी हॉल क्लिनिकचे मुख्य कार्यकारी अधिकारी बेहराम खोडाईजी म्हणाले की,कॅथ लॅब ही केवळ सुविधा नसून शिरूर तालुक्यातील अनेक कुटुंबियांसाठी आशेचे प्रतीक आहे.प्रगत हृदयरोग चिकित्सा सुविधेमुळे आपल्या समुदायाच्या आरोग्यासाठी आणि भविष्यासाठी ही एक स्तुत्य गुंतवणूक आहे.यासारखे उपक्रम आपल्याला आठवण करून देतात की आरोग्यसेवा ही सामाईक जबाबदारी असून एकत्रितपणे आपण आणखी चांगला प्रभाव पाडू शकतो.प्रगत आरोग्यसेवा जिथे मिळणे खरोखरच परिवर्तनकारी ठरेल अशा शिरूरसारख्या ठिकाणी अप्रतिम पायाभूत सुविधा उपलब्ध करून दिल्याबद्दल रसिकलाल धारिवाल यांच्या कुटुंबियांचे आम्ही मनापासून आभारी आहोत.

प्रकल्पाच्या महत्त्वावर भर देताना फियाट इंडिया ऑटोमोबाईल्स प्रा.लि.(एफआयएपीएल) चे वरिष्ठ उपाध्यक्ष राकेश बवेजा यांनी सांगितले की, एफआयएपीएलमध्ये व्यवसायापलीकडे जाऊन समाजामध्ये सक्रीयपणे योगदान देण्यावर आम्ही विश्वास ठेवतो. आरोग्यसेवा हे आमच्या सामाजिक विकास उपक्रमांमध्ये प्राधान्यक्रमात आहे आणि कॅथ लॅब स्थापन करण्याच्या उपक्रमाला समर्थन देणे हे या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल आहे.2014 पासून आम्ही स्थानिक समुदायाबरोबर काम करत आहोत आणि पुणे जिल्ह्यात शिक्षण,पर्यावरण आणि ग्रामविकास उपक्रमांमध्ये 80 कोटी रूपयांपेक्षा जास्त गुंतवणूक केली आहे.

ही कॅथलॅब सुविधा शिरूर तालुक्यातील आरोग्यसेवेच्या पायाभूत सुविधांवर कायमस्वरूपी सकारात्मक प्रभाव निर्माण करण्याच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल आहे. प्रगत हृदयरोग चिकित्सा सर्वांना उपलब्ध करून देत ही जागतिक दर्जाची सुविधा या भागात प्रस्थापित करण्यासाठी रूबी हॉल क्लिनिकसोबत सहकार्य केल्याचा आम्हाला अभिमान आहे.

ही नवीन सुविधा म्हणजे रूबी हॉल क्लिनिकचे कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी आणि आरोग्यसेवेमध्ये सतत सुधारणा करण्याप्रती असलेली कटिबद्धता दर्शविते. ही कॅथ लॅब सुविधा केवळ या भागातील लोकांच्या हृदय आरोग्य संबंधित असलेल्या तत्काळ गरजा पूर्ण करत नाही तर लवकर निदान,प्रतिबंध आणि उपचाराद्वारे चांगले परिणाम साध्य करण्याच्या रूबी हॉल क्लिनिकच्या दीर्घकालीन उद्दिष्टाला बळकटी देते.

ACLS TIMES” YOUTUBE चॅनेल ला LIKE SUBSCRIBE आणि COMMENT करा. 🙏

ACLS इंटरनॅशनल प्रेस रिपोर्टर असोसिएशन

शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button