ताज्या घडामोडी

वाई:-(कळंबे):-अठ्ठ्यांऐंशी लाख रक्कमेच्या विविध विकासकामांचे भूमिपूजन व लोकार्पण सोहळा

राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण:-8208717483

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483

RPS STAR NEWS

अठ्ठ्यांऐंशी लाख रक्कमेच्या विविध विकासकामांचे भूमिपूजन व लोकार्पण सोहळा.

ग्रामपंचायत कळंभे ता वाई जि.सातारा यांचे वतीने आज गुरुवार दिनांक -२६/९/२०२४ रोजी कळंभे गावातील एकुण अठ्ठ्यांऐंशी लाख रक्कमेच्या विविध विकासकामांचे भूमिपूजन व लोकार्पण सोहळा राज्यसभेचे नवनियुक्त खासदार व जिल्हा बँकेचे अध्यक्ष मा.नितीनकाका पाटील, जननायक आमदार मा.श्री.मकरंद आबा पाटील, किसनवीर कारखान्याचे उपाध्यक्ष मा.श्री.प्रमोददादा शिंदे, कळंभे गावचे सुपुत्र व बहुजन मुक्ती पार्टीचे राज्य कार्याध्यक्ष मा.श्री.तुषार मोतलिंग यांचे हस्ते व वाई तालुक्यातील अन्य पदाधिकारी यांचे उपस्थितीत संपन्न झाला.
सदरील प्रसंगी आज रोजी कळंभे गावातील एकुण ९ विकासकामांचे भुमीपुजन व लोकार्पण संपन्न झाले.सोहळ्यात कळंभे गावचे प्रथम नागरिक सरपंच सौ.निलम शिवथरे यांनी मान्यवरांचे स्वागत केले.तसेच मा.श्री.नितीन काका पाटील यांची राज्यसभेवर खासदार म्हणून निवड झालेबद्दल ग्रामपंचायत व ग्रामस्थ मंडळ कळंभे यांचे वतीने महाराष्ट्रीयन फेटा,पुष्पगुच्छ, सन्मानचिन्ह,श्रीफळ दुवुन भव्य नागरी सत्कार करण्यात आला.त्याचप्रमाणे निराधार महिला-अपंग- परीतक्या पेन्शनर संघटना यांचे वतीने आ.मकरंद आबा पाटील यांचा सन्मान करण्यात आला.त्याचप्रमाणे अन्य मान्यवरांचे स्वागत देखील गावातील सामान्य कार्यकर्ते यांच्या हस्ते करण्यात आले.
कळंभे गावातील या सोहळ्याला कळंभे गावातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती दाखवली.कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी ग्रामपंचायत कळंभे चे सरपंच सौ.निलम शिवथरे, उपसरपंच श्री.आबाजी सुतार,आदर्श सरपंच सौ.ज्योती गायकवाड,मा.सरपंच सौ.सारीका गायकवाड,भावी उपसरपंच सौ.शकुंतला चव्हाण,माजी उपसरपंच श्री.प्रकाश बाबर,मकरंद आबा पाटील यांचे कट्टर समर्थक व उद्योजक श्री.विक्रम शिवथरे,श्री.रमेश वाघमारे गुरूजी,श्री.सितारामबापु पनवेलकर,श्री.अक्षय दत्तात्रय गायकवाड, श्री.संतोष अरविंद गायकवाड, श्री.नितीन गायकवाड, श्री.नारायण जाधव, श्री.शंकर विठ्ठल गायकवाड,श्री.प्रमोद गायकवाड,श्री.ओमकार गायकवाड,श्री.आदिनाथ गायकवाड,श्री.सुरज शिवथरे,श्री.भोजराज वाघ,श्री.गजानन गायकवाड,श्री.साहेबराव गायकवाड,श्री.संजय कोंडीराम शिवथरे, श्री.विकास दिनकर शिवथरे,श्री.अमित चव्हाण,श्री.अमोल सुतार,श्री.विनोद शिवथरे,श्री.प्रसाद वाघमारे,श्री.धनाजी वाघमारे,श्री.संजय बापुराव गायकवाड,श्री.दिनकर आबा शिवथरे,श्री.विठ्ठल शिवथरे,श्री.प्रदिप शिवाजी शिवथरे,श्री.प्रदिप धर्मु शिवथरे,श्री.ज्ञानेश्वर निवृत्ती शिवथरे,श्री.ज्ञानेश्वर जगन्नाथ शिवथरे,श्री.जीवन शिवथरे,श्री.शिवाजी वाघमारे,श्री.रनजित गायकवाड,श्री.नितीन शिंगटे,श्री.सुनिल वाघ,श्री.सुनिल जाधव,श्री.मानसिंग गायकवाड,श्री.विनायक गोगावले,श्री.हणमंत जाधव, श्री तुषार राजेंद्र शिवथरे, श्री.रोहिदास शिवथरे,श्री शंकर शिवथरे, श्री सत्यम गायकवाड,श्री.दत्तात्रय पवार व इत्यादी कार्यकर्ते यांनी कार्यक्रम यशस्वी होणेकामी प्रयत्न केले.
सुत्रसंचलन प्राथमिक शिक्षक बँकेचे मा.चेअरमन श्री.विठ्ठल माने यांनी केले. व आभार आदर्श सरपंच ज्योती गायकवाड यांनी मानले.

ACLS TIMES” YOUTUBE चॅनेल ला LIKE SUBSCRIBE आणि COMMENT करा. 🙏

ACLS इंटरनॅशनल प्रेस रिपोर्टर असोसिएशन

शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button