सातारा:-लढा आरक्षणाचा… वडार समाज आरक्षणाच्या लढाईसाठी सरसावला.
पत्रकार श्रीनिवास पवार ACLS चीफ रिपोर्टर सातारा जिल्हा

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
पत्रकार श्रीनिवास पवार ACLS चीफ रिपोर्टर सातारा जिल्हा
RPS STAR NEWS
लढा आरक्षणाचा…
वडार समाज आरक्षणाच्या लढाईसाठी सरसावला.
सातारा प्रतिनिधी दि. १४
स्वातंत्र्य मिळून आज ७५ वर्षे पूर्ण झाली आहेत तरीही वडार समाजाला योग्य आरक्षण, स्वतः ची जागा आणि घर, शैक्षणिक सुविधा मिळत नाहीत हि मोठी खेदाची व चिंताजनक बाब असल्याचे मत वडार समाजाच्या विदर्भ कन्या संगिताताई पवार यांनी सातारा येथे व्यक्त केले.
लढा आरक्षणाचा हा मुद्दा घेऊन क्रांती घडविण्यासाठी संगिताताई पवार यांनी संवाद यात्रा सुरू केली आहे. पश्चिम महाराष्ट्र दौऱ्यावर आल्या असताना सातारा येथे त्यांनी वडार समाजातील महिला, युवक व कार्यकर्त्यांशी संवाद साधला.
आरक्षणाच्या मुद्दय़ावर एक व्हा असे आवाहन केले. आता स्वतः साठी पुढे या. जातीसाठी खावी माती या म्हणीप्रमाणे आता ती वेळ आली आहे. समाजातील सर्व लोकांची एकजुट दाखवली तर आपल्या कडे वाईट नजरेने बघण्याची कुणाचीही हिम्मत होणार नाही. आजपर्यंत अनेक मेळावे, मोर्चे काढले पण त्याचा समाजाला काहिच उपयोग झाला नाही. भावी पिढीचे भविष्य काय आहे. कुत्रा, मांजराचे जीवन वडार समाज आजही जगत आहे. माझ्या समाज्याची परिस्थिती अत्यंत दयनीय आहे. महिलांनी तर आज एकत्रित येणे गरजेचे आहे. यापुढे मी आरक्षण लागू करण्यात यावे म्हणून उपोषण करणार आहे असे संगिताताई पवार यांनी संवाद यात्रेप्रसंगी सांगितले.
यावेळी उपस्थित महिलांनी विदर्भ कन्या संगिताताई पवार यांचे सातारी कंदी पेढा भरवून स्वागत केले.
या प्रसंगी शामराव विटकर, हरिष बंडीवडार, शांताराम मनवरे, संदीप पिसाळ, उज्वलाताई निंबाळकर तसेच सातारा जिल्ह्यातील महिला, युवक व कार्यकर्ते उपस्थित होते.