सातारा:-२९ जुलैला झाडाणी निकालासाठी साताऱ्यात अंतिम सुनावणी…
ज्येष्ठ पत्रकार अजित जगताप सातारा

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
ज्येष्ठ पत्रकार अजित जगताप सातारा
RPS STAR NEWS
२९ जुलैला झाडाणी निकालासाठी साताऱ्यात अंतिम सुनावणी…
सातारा दि:
सहयाद्री वाचवा मोहीमेतंर्गत उघडकीस आणलेले झाडाणी प्रकरण सध्या चांगलेच गाजत आहे. विधीमंडळाच्या अधिवेशनात हा प्रश्न गेला. आज सातारा जिल्हाधिकारी कार्यालयात अप्पर जिल्हाधिकारी जीवन गलांडे यांच्यासमोर सुनावणी झाली. यावेळी संबंधितांनी म्हणणे मांडले आणि काही कागदपत्रे दिली आणि उर्वरित कागदपत्र सादर करण्यासाठी आणखी मुदत देण्याची मागणी केली. त्यावर अप्पर जिल्हाधिकारी जीवन गलांडे यांनी दि.२९ जुलै ही अंतिम सुनावणीसाठी जाहीर केले आहे. याच दिवशी या प्रकरणी निकाल लागणार आहे.
झाडाणी (ता. महाबळेश्वर) येथील तब्बल ६४० एकर जमीन गुजरात राज्याचे जी.एस.टी. आयुक्त चंद्रकांत वळवी आणि त्यांच्या नातेवाईकांनी बळकावल्याचे कागदपत्रांवरुन स्पष्ट झाले होते. याप्रकरणी पहिल्यांदा तिघांना आणि नंतर आठ जणांना नोटीसा बजावण्यात आल्या होत्या. आज झालेल्या सुनावणी वेळी जीएसटी आयुक्त चंद्रकांत वळवी, अनिल वसावे, संगीता वळवी , अरमान वळवी, यांच्यासह संबंधित उपस्थित होते. यावेळी त्यांनी आपले म्हणणे मांडले आणि काही कागदपत्रे सादर केली परंतु अजून काही कागदपत्र सादर करण्यासाठी मुदत मागितली. सातारा जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात प्रसारमाध्यमाशी बोलताना कमाल जमीन कायद्याचे उल्लंघन झाल्याचे प्रथमदर्शनी संबंधितांनी मान्य केले. उर्वरित प्रकरणाबाबत निकालाची प्रतीक्षा असल्याचे स्पष्ट केले. याबाबत माहिती अधिकाराचे कार्यकर्ते सुशांत मोरे यांनी पाठपुरावा केल्यामुळे चार वेळा ही सुनावली झाली आता अंतिम सुनावणी होत असल्याने संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागून राहिलेले आहे. सामाजिक कार्यकर्ते सुशांत मोरे यांनी प्रसार माध्यमाला लिखित स्वरूपात माहिती देऊन या प्रकरणाचा छडा लावल्याबद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे. सातारा जिल्हाधिकारी कार्यालयात सोमवार दिनांक 29 जुलै रोजी आंतरराष्ट्रीय व्याघ्रदिनानिमित्त सुनावणी व निकाल होणार असल्याने खऱ्या अर्थाने लोकशाहीला बळकटी मिळाली आहे असे मानण्यात येत आहे.
————————————-++++
फोटो सातारा जिल्हाधिकारी कार्यालयात आपले म्हणणे मांडताना जीएसटी आयुक्त चंद्रकांत वळवी व तक्रारदार सुशांत मोरे (छाया- अजित जगताप, सातारा)