सातारा:-आषाढी एकादशी नंतरच सातारा जि प पुरवणी अंदाजपत्रक वारी.
ज्येष्ठ पत्रकार अजित जगताप सातारा

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
ज्येष्ठ पत्रकार अजित जगताप सातारा
RPS STAR NEWS
आषाढी एकादशी नंतरच सातारा जि प पुरवणी अंदाजपत्रक वारी.
सातारा दि: सातारा जिल्हा परिषदेच्या इतिहासामध्ये सलग तीन वर्ष जिल्हा परिषद पदाधिकारी व सदस्यविना अंदाजपत्रक व पुरवली अंदाजपत्रक मंजूर होत आहे . या हॅट्रिक कामगिरीचे संपूर्ण श्रेय हे कर्तव्यदक्ष प्रशासकीय अधिकाऱ्यांना जात आहे. यंदाच्या वर्षी आषाढी एकादशी नंतर सातारा जिल्हा परिषद पुरवणी अंदाजपत्रक सादर करण्यात येणार असल्याचे अधिकृत सूत्रांकडून माहिती मिळालेली आहे. सातारा जिल्हा परिषदेच्या दृष्टीक्षेपातील सन २०२३-२४ चे अंतिम व सन २०२४-२५ चे मूळ अंदाजपत्रक जमा बाजू व खर्च बाजू यामध्ये आरंभीची शिल्लक, परिषद महसुली जमा, भांडवली जमा याचबरोबर खर्चामध्ये महसुली खर्च ,भांडवली खर्च, पंचायत समिती महसुली खर्च ,भांडवली खर्च असा एकूण संपूर्ण ताळेबंद लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे अगोदर मांडण्यात आला. जानेवारी २०२४ मध्ये मूळ अंदाजपत्रक सादर केले होते. आता यामध्ये किमान २० टक्के पुरवणी अंदाजपत्रक मंजूर होण्याची ही तिसरी वेळ असून प्रशासकीय कामगिरी उत्तमरित्या पार पाडल्याबद्दल सातारा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती याशनी नागराजन, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी महादेव घुले, मुख्य लेखा वित्त अधिकारी राहुल कदम व सामान्य प्रशासनाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी निलेश घुले हे खरे मानकरी ठरलेले आहेत. इतर विभागातील सर्वच अधिकाऱ्यांचेही मोलाचे सहकार्य लाभलेले आहे.
मूळ अंदाजपत्रकासमवेत पुरवणी अंदाजपत्रकामध्ये महसुली जमा, भांडवली जमा, कर व फी ,स्थानिक उपकर, पाणीपट्टीवरील कर, अनुदाने, व्याज ,पोलीस, शिक्षण, वैद्यकीय आरोग्य, कृषी, पशुसंवर्धन, सार्वजनिक बांधकाम, संकीर्ण व भांडवली जमा अशा अठरा भाग आहेत. खर्चामध्ये मानधन ,सामान्य प्रशासन, शिक्षण ,इमारत व दळणवळण, लघुपाटबंधारे, आयुर्वेद ,आरोग्य, सार्वजनिक आरोग्य अभियांत्रिकी, कृषी, पशुसंवर्धन, वने ,समाज कल्याण, सामूहिक विकास, संकीर्ण, महिला बालकल्याण, एकात्मिक बाल विकास, सेवा योजना भांडवली खर्च ,पंचायत समिती अंदाजपत्रक जमा व खर्च, देखभाल व दुरुस्ती निधी, असं सर्व विभागातील आर्थिक आढावा घेऊन पुरवणे अंदाजपत्रक तयार करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे.
सध्या सातारा जिल्ह्यामध्ये पंढरीची वारी निघाली आहे. यामध्ये लोकसभा निवडणुकीनंतर अत्यंत चांगल्या पद्धतीने सातारा जिल्हा परिषदेने निवडणूक व वारकऱ्यांची चोख व्यवस्था केल्यामुळे तसेच गेल्या आठवड्यात समाधानकारक पाऊस होत असल्याने जनतेमध्येही समाधान पसरलेले आहे.
सध्या सातारा जिल्हा परिषद विकास कामांमध्ये अग्रेसर राहिलेले आहे . सातारा जिल्हा परिषद पदाधिकारी व सदस्यांविना उत्कृष्ट कामगिरी होत असून पाझर तलाव, मॉडेल अंगणवाडी, मॉडेल स्कूल, नळ पाणीपुरवठा योजना, पशुपालन,बियाणे वाटप, मधुराशिका पालन, स्मार्ट प्राथमिक आरोग्य केंद्र, अंकुर बाल शिक्षण अशा विविध योजनांसाठी चांगल्या पद्धतीने नियोजन व मार्गदर्शन झालेले आहे.
सर्वच विभागांमार्फत सातारा जिल्हा परिषदेने स्वनिधी व मूळ अंदाजपत्रक याची मांडणी केलेली आहे . त्याला प्रशासकीय मंजुरी मिळण्यास कोणतीही अडचण होणार नाही. प्रत्येक विभागातील अधिकारी आपल्या विभागातील अंदाजपत्रक व पुरवणी अंदाजपत्रक मांडणीसाठी प्रयत्नशील राहिलेले आहेत. सातारा जिल्हा परिषदेच्या अंदाजपत्रकाला पुरवणी अंदाजपत्रकाची जोड मिळणार असून बुधवार दिनांक १७ जुलै रोजी आषाढी एकादशी नंतर पुरवणी अंदाजपत्रक मांडण्यात येईल. अशी माहिती अधिकृत सूत्रांनी दिलेली आहे .
सातारा जिल्ह्यात महाराष्ट्रीय बेंदूर १९ जुलै रोजी असून या दिवशी छत्रपती शिवाजी महाराजांची वाघनखे छत्रपती शिवाजी महाराज वस्तुसंग्रहालय सातारा या ठिकाणी येणार आहे. त्यापूर्वीच सातारा जिल्हा परिषदेत पुरवणी अंदाजपत्रक मांडण्यात येणार असून त्याची जय्यत तयारी युद्धपातळीवर सुरू करण्यात आलेले आहे.
—————————-
फोटो -सातारा जिल्हा परिषद पुरवणी अंदाजपत्रकासाठी सज्ज (छाया-अजित जगताप,सातारा)