गंगापूर तालुक्यात पावसाच्या जोरदार आगमनाने डोणगाव येथे कारल्याचे पीक भुईसपाट.
पत्रकार ज्ञानेश्वर सोमासे गंगापूर

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
पत्रकार ज्ञानेश्वर सोमासे गंगापूर
RPS STAR NEWS
गंगापूर तालुक्यात पावसाच्या जोरदार आगमनाने डोणगाव येथे कारल्याचे पीक भुईसपाट.
गंगापूर तालुक्यात पावसाने लावली हजेरी पावसाळा सुरू होऊन एक महिना उलटून गेला तरी सुद्धा पाऊस पडत नसल्याने शेतकरी राजा मध्ये दुबार पेरणीचे संकट निर्माण होते की काय असा प्रश्न उपस्थित झाला होता परंतु निसर्गाची देण मंगळवारी रात्री अचानक पावसाने सुरुवात केली यामुळे शेतकरी मध्ये आनंदाचे वातावरण पाहायला मिळाले गंगापूर तालुक्यात ३० टक्के पावसाची नोंद करण्यात आली आहे अशी माहिती मिळाली आहे दिनांक ९ जुलै रोजी रात्री अचानक पावसाने लावली हजेरी रात्रीचा वेळ असल्यामुळे नागरिकांना पावसाचा अंदाज कळाला नाही परंतु मंगळवारी दिवसभर पाऊस चांगला झाल्याची चर्चा गंगापूर शहरांमध्ये सुरू झाली होती या संदर्भात गंगापूर तहसील कार्यालय येथे पाऊस किती टक्के झाला आहे अशी माहिती विचारण्यात आली असता ३० टक्के गंगापूर तालुक्यात पाऊस झाला आहे अशी माहिती मिळाली. पावसाळा सुरू होऊन एक महिन्यानंतर दिलासादायक पावसाने लावली हजेरी पाऊस पडण्यापूर्वी शेतकऱ्यांची चिंता वाढली होती. परंतु आता पाऊस पडल्यामुळे शेतकरी राजा
मध्ये आनंदाचे वातावरण पाहायला मिळत आहे,डोणगाव येथेल शेतकरी विजुभाऊ चैन सिंग सुलाने यांच्या गट नंबर 153 मधील दोन एकर कारल्याचा प्लॉट पूर्णपणे बांबू पडल्याने जमिनीवर आडवा झाला असून या कारल्यांचा अंदाज तीन ते चार टन माल असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले.