क्राईम न्युजताज्या घडामोडीमहाराष्ट्र

नेरुळ:- गुंडगिरी करणाऱ्या रिक्षाचालकांवरती कठोर कारवाईची मागणी – जनसेवा रिक्षाचालक-मालक संस्था.

पत्रकार अच्छेलाल जैस्वार मुंबई अध्यक्ष 

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483

 पत्रकार अच्छेलाल जैस्वार मुंबई अध्यक्ष

RPS STAR NEWS

नेरुळ:- गुंडगिरी करणाऱ्या रिक्षाचालकांवरती कठोर कारवाईची मागणी – जनसेवा रिक्षाचालक-मालक संस्था.

नेरुळ:- गुंडगिरी करणाऱ्या रिक्षाचालकांवरती कठोर कारवाईची मागणी – जनसेवा रिक्षाचालक-मालक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष आणि सभासद यांनी ACLS इंटरनॅशनल प्रेस रिपोर्टर असोसिएशनचे राष्ट्रीय अध्यक्ष माननीय श्री प्रल्हाद चव्हाण यांच्याकडे तक्रार अर्ज दाखल करण्यात आला आहे. डी वाय पाटील हॉस्पिटल नेरूळ येथील रिक्षा स्टॉप वरती तासंतास लाईन मध्ये उभ्या असलेल्या रिक्षांचा विचार न करता काही गुंड प्रवृत्तीच्या रिक्षाचालक रिक्षाची दुसरी लाईन्स सुरू करून भाडेकरू येऊन डायरेक्ट प्रवाशांना घेऊन जातात. त्यामुळे तासंतास लाईन मध्ये उभ्या असलेल्या रिक्षा चालकांना व्यवसाय करण्यास खूप मोठी अडचण निर्माण होत आहे. तसेच ज्येष्ठ नागरिक आणि प्रवासी यांच्याशी उद्धटपणाने वागणे, त्यांच्याशी गैर व्यवहार करणे अशा प्रकारचे गुंडगिरी प्रवृत्तीचे रिक्षा चालक करत आहेत. त्यामुळे सरळ मार्गाने नियमांचे पालन करून व्यवसाय करणाऱ्या रिक्षा चालक मालक यांना अशा गुंड प्रवृत्तीच्या रिक्षाचालकांकडून न्याय मिळणार का? त्यांच्यावर कारवाई होणार का? पोलीस प्रशासनाचे याकडे लक्ष का नाही? असे बरेच प्रश्न उपस्थित होतात. रिक्षा स्टॅन्ड वरील नियमांचे पालन करणाऱ्या रिक्षाचालकांना सुद्धा या दादागिरीला सामोरे जावे लागत आहे. प्रवाशांना रांगेतून न घेता मध्येच घुसून दादागिरी करणारे रिक्षाचालक प्रवासी घेऊन जातात आणि नियमांचे उल्लंघन करतात. नियमांचे पालन करणारे रिक्षा चालक यांनी याबाबत काही हरकत घेतल्यास गुंडगिरी करणारे रिक्षा चालक त्या रिक्षा चालकांसोबत हाणामारी करतात. या गुंडगिरी करणाऱ्या रिक्षा चालकांमुळे कायद्यावर असणारा, नियमांचे पालन करणाऱ्या रिक्षाचालकांचा विश्वास डळमळीत होऊ लागलेला आहे. त्यामुळे जनसेवा रिक्षा चालक-मालक संस्थेत चे अध्यक्ष संस्थापक तसेच सभासद यांनी ACLS इंटरनॅशनल प्रेस रिपोर्टर असोसिएशन कडे तक्रार दाखल केलेली आहे. आणि आपल्या माध्यमातून आपण आम्हाला न्याय मिळवून द्याल अशी आशा व्यक्त केले आहे.

ACLS TIMES” YOUTUBE चॅनेल ला LIKE SUBSCRIBE आणि COMMENT करा. 🙏

ACLS इंटरनॅशनल प्रेस रिपोर्टर असोसिएशन

शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button