पुणे:- आंबेगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत जुन्या कात्रज घाटामध्ये भिलारेवाडी येथील वळणा जवळ पीएमटी बसची मोटार सायकल ला पाठीमागून धडक.
पत्रकार अब्दुल रहीम शेख कात्रज शहराध्यक्ष

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
माहिती आणि प्रसारण मंत्रालय दिल्ली नोंदणीकृत
पुणे:- आंबेगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत जुन्या कात्रज घाटामध्ये भिलारेवाडी येथील वळणाजवळ पीएमटी बसची मोटार सायकल ला पाठीमागून धडक.

फेटल अपघाताविषयी आंबेगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत आज दि. 14/10/2025 रोजी सकाळी 08:40 वा.चे सुमारास जुन्या कात्रज घाटामध्ये भिलारेवाडी येथील वळणाजवळ पीएमटी बस क्र. MH14/HU/6432 हिने हिरो होंडा पॅशन मो. सायकल क्र. MH/12/FB/0348 यास पाठीमागून जोरात धडक दिल्याने अपघात झाला.
सदर अपघातात मोटरसायकल वरील इसम नामे 1) आकाश रामदास गोगावले, वय 29 वर्षे रा. ससेवाडी ता. भोर, पुणे व 2) अनुष्का प्रकाश वाडकर, वय 27 वर्षे रा. वरील प्रमाणे हे मयत झाले असून 3) नेहा कैलास गोगावले, वय 20 वर्ष रा. वरील प्रमाणे या जखमी आहेत. जखमीवर भारती हॉस्पिटल येथे उपचार चालू आहेत.
तसेच सदर पीएमटीचे चालक नामे 1) सुधीर दिलीप कोंडे, वय 42 वर्ष रा. आर्वी, पुणे यास ताब्यात घेतले असून त्यास वैद्यकीय तपासणी कामी पाठवण्यात आले आहे. सदर बाबत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया चालू असून वपोनि स्टाफ सह घटनास्थळी हजर असून वाहतूक सुरळीत करण्यात आली आहे.




