मावळ:-स्पंदन फाउंडेशन व खुशी के रंग फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने कोथूर्णे येथे ५० आदिवासी कातकरी व गरजू विद्यार्थ्यांंना स्कूल कीट चे वाटप.
पत्रकार धर्मेंद्र ठाकर मावळ:-9960044802

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
पत्रकार धर्मेंद्र ठाकर मावळ
स्पंदन फाउंडेशन व खुशी के रंग फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने कोथूर्णे येथे ५० आदिवासी कातकरी व गरजू विद्यार्थ्यांंना स्कूल कीट चे वाटप.
आज शनिवार (दि. २२) रोजी मावळ तालुक्यातील ग्रामीण भागात असलेल्या कोथूर्णे गावातील वाघजाई वस्ती आणि चिंचवाडी येथे असलेल्या जिल्हा परिषदेच्या शाळेतील कातकरी आदिवासी आणि इतर गरजू अशा एकूण ५० विद्यार्थ्यांंना खुशी के रंग फाऊंडेशन कडून आणि स्पंदन फाउंडेशन या संस्थेच्या माध्यामातून ५० विद्यार्थ्यांंना मोफत स्कूल कीटचे वाटप करण्यात आले. या कीट मध्ये स्कूल बॅग, ४ वह्या, चित्रकला वही, रंगीत खडू, पेन, पेन्सिल, खोडरबर, शार्पनर, पाउच इत्यादी साहित्यांचा समावेश आहे.
संविधानाने दिलेल्या शिक्षणाच्या मूलभूत अधिकार असलेल्या परंतु मूलभूत सुविधांपासून वंचित असलेल्या आदिवासी कातकरी समाजाचे एकूण ५० विद्यार्थी या दोन्ही शाळांमधे शिक्षण घेत आहेत. शिक्षणविषयक जनजागृती नसल्याने या आदिवासी कातकरी मुलांचे शाळा सोडण्याचे प्रमाण तुलनेने अधिक असते. परंतु या मुलांना अशा विविध संस्थानी वेळोवेवेळी मदतीचा हात दिल्यास या मुलांमध्ये देखील शिक्षणाची गोडी निर्माण होईल, असे मत शाळेचे मुख्याध्यापक नितीन वाघमारे यांनी व्यक्त केले. खुशी के रंग फाऊंडेशन मार्फत राज्यभर गरीब आणि गरजू विद्यार्थ्यांना अशाप्रकारची मदत करण्याचे काम गेली ८ वर्षे अविरतपणे सुरू आहे. आम्हाला भविष्यात अनेक ए. पी. जे. अब्दुल कलाम घडवायचे आहेत. आणि म्हणुनच त्यांच्या प्रेरणेने प्रेरित होऊन एक कदम कलम से कलाम की ओर असा उपक्रम हाती घेतल्याचे खुशी के रंग फाऊंडेशनचे निलेश शिंगे यांनी यांनी सांगितले. आदिवासी मुलांच्या चेहर्यावरील आनंद पाहून सर्वांनी योग्य ठिकाणी मदत झाल्याची भावना व्यक्त केली. यावेळी निलेश शिंगे, श्रद्धाअहिरराव(राजगुरु), राजेंद्र राजगुरू, स्पंदन फांउडेशन चे संस्थापक धर्मेंद्र ठाकर, मुख्याध्यापक नितीन वाघमारे, मधुकर दळवी, आणि अंगणवाडी सेविका सुनंदा निंबळे आदि उपस्थित होते.