दहिवडी:-माण तालुक्यात झालेल्या अपघातात दोन तरुण ठार.
ज्येष्ठ पत्रकार अजित जगताप सातारा

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
ज्येष्ठ पत्रकार अजित जगताप सातारा
RPS STAR NEWS
माण तालुक्यात झालेल्या अपघातात दोन तरुण ठार.
दहिवडी दि: आज खऱ्या अर्थाने दुष्काळी भागातील माण तालुक्यामध्ये शनिवार हा घात वार ठरला. सकाळी नऊ वाजता शेरेवाडी फाटा येथे झालेल्या अपघातात दोन तरुण ठार झाल्याची दुर्दैवी घटना घडली.
याबाबत माहितीगारांनी सांगितलं की, शनिवारी सकाळी नऊ वाजता अनिकेत नितीन मगर वय- २५ व रणजीत राजेंद्र मगर वय -३० हे दोन तरुण स्कुटी एम एच- ११- डी के- ८४५५ या वाहनाने बिदालच्या दिशेने निघाले होते. त्याच वेळेला शेरेवाडी फाटा या ठिकाणी स्कार्पियो एम एच ११ डी एन १०० या काळ्या रंगाच्या स्कार्पिओ गाडीची जोरदार धडक झाल्याने सकाळी हा अपघात झाला.
सदरच्या अपघात शेरेवाडी फाट्यावर झाल्यामुळे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव रस्त्यात पडला होता. उपस्थित काही लोकांनी तातडीने उपचारासाठी दोन तरुणांना दहिवडी शासकीय ग्रामीण रुग्णालयात घेऊन गेले. परंतु, अतिरक्तस्राव व मोठा अपघात झाल्याने त्यांचे प्राण वाचवता आले नाही. सदर अपघातानंतर पोलीस यंत्रणेने तातडीने त्या ठिकाणी पंचनामा केला आहे . स्कार्पिओ ही गाडी माण- खटावचे भाजपचे आमदार जयकुमार गोरे यांच्या अनेक दौऱ्यामध्ये असते. अशी माहिती गारांनी सांगितले. सदर अपघातामुळे शेतकरी मगर कुटुंबियावर दुःखाचा सावट पसरला आहे. अपघाताने दोन तरुणांचे जीव गेले आहे. या अपघाताचे नेमके कारण अद्याप समजू शकले नाही. या मगर कुटुंबीयांचा आधार गेल्यामुळे सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. याबाबतची नोंद स्थानिक पोलीस ठाण्यात झाली असून अधिक तपास पोलीस यंत्रणा करत आहे.