गंगापूर:-शेतकरी कृती समिती गंगापुरच्या एल्गार आंदोलनामुळे समोर आले पिकविमा वास्तव्य – कापुस पिकाला सरसकट विमाच नाही…..!
पत्रकार ज्ञानेश्वर सोमासे गंगापूर

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
पत्रकार ज्ञानेश्वर सोमासे गंगापूर
RPS STAR NEWS
शेतकरी कृती समिती गंगापुरच्या एल्गार आंदोलनामुळे समोर आले पिकविमा वास्तव्य – कापुस पिकाला सरसकट विमाच नाही…..!
दि २८ जुन २०२४ रोजी शेतकरी कृती समितीच्या वतीने खरिप २०२३-२४ चा पिकविमा खात्यात जमा करण्यासाठी तालुका कृषी अधिकारी कार्यालय येथे एल्गार आंदोलन करण्यात आले होते यावेळी शेतकरी कृती समितीच्या वतीने इंजी.महेशभाई गुजर,आण्णासाहेब जाधव,राहुल ढोले पाटील यांनी खरिप २०२३-२४ नुकसान व जमा झालेल्या रक्कमची वास्तविकता समोर आणल्या नंतर चोलामंडलम कृषीविमा कंपनीच्या प्रतिनिधींनी दिलेल्या आकडेवारी नुसार
खरिप २०२३ हंगामात वेळोवेळी ५१२९४ online तक्रारी प्राप्त झाल्या होत्या त्यापैकी आसेगाव,भेंडाळा, डोणगाव,गाजगाव,गंगापुर,हर्सुल, जामगाव,मांजरी,सेंदुरवादा,सिध्देनाथ वाढगाव, तुर्काबाद व वाळुज मंडळ
मिळुन वैयक्तिक नुकसान भरपाई पोटी मुग,सोयाबीन,सोयाबीन व कापुस पिकांचे मिळुन फक्त १४१४० शेतकर्यांना १३ कोटी ३९ लाख ४९ हजार रूपये वाटण्यात आले.
मध्य हंगाम प्रतिकूल परिस्थितीत झालेल्या नुकसानी पोटी भेंडाळा, गाजगाव,मांजरी,सेंदुरवादा,सिध्देनाथ वाढगाव मंडळात मक्का, सोयाबीन व कापुस पिकांचे मिळुन ४९२३२ शेतकर्यांना २१ कोटी २३ लाख ६५०४ रूपये.
तर कापणी प्रयोगाच्या आधारे कापुस पिक सोडुन आसेगाव,भेंडाळा,डोणगाव, गंगापुर,हर्सुल,जामगाव मंडळाला फक्त मक्का व मुग पिकाचा ८९१० शेतकर्यांना ४ कोटी ५७ लाख ७८ हजार ६६७ रूपये मंजुर करण्यात आले.असल्याची माहीती चोलामंडलम कृषी विमा कंपनी च्या प्रतिनिधींनी दिली आहे.
खरिप २०२३-२४ हंगाम संपून नविन खरिप हंगामाचा पिकविमा उतरविणे सुरू असुन सुद्धा पिक कापणी अंतिम आकडेवारीनुसार कापुस पिकाला हेक्टरी किती पिक देण्यात आला त्याचे प्रमाणे कोणत्या मंडळात कोणत्या पिकाला हेक्टरी किती रूपये मिळाले हे न सांगता आल्याने तालुका कृषी अधिकारी बापुराव जायभाय यांनी चोलामंडलम कृषी विमा कंपनीला पञ देऊन ५ जुलै २०२४ पर्यंत गंगापुर तालुक्यातील सर्व १२ मंडळाची मंजुर नाम मंजुर यादी व हेक्टरी आकडेवारी देऊन पिककापणी अहवाल्याच्या आधारे कापुस पिकाचा विमा देण्यात यावा अशी मागणी केली आहे.त्यामुळे दि १० जुलै २०२४ पर्यंत कापुस खात्यात पैसे येतील असे आश्वासन मिळाल्यानंतर शेतकरी कृती समिती ने आंदोलन तात्पुरते स्थगित केले आहे
यावेळी चोलामंडलम विमा कंपनीचे क्लस्टर प्रमुख श्री हेमंत शिंदे, तालुका प्रतिनिधी
प्रविण जगताप,तालुका कृषी अधिकारी श्री बापुराव जायभाय,शेतकरी कृती समितीचे आण्णासाहेब जाधव,राहुल ढोले पाटील,इंजी.महेशभाई गुजर,
रामेश्वर अमृते,अशोक कीर्तीकर,सुदाम घुले,राजेंद्र शेळके,राजु शेळके,संदिप काळे,अंबादास गायके,गायकवाड यांच्या सह पिकविमा धारक शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
गंगापुर पोलीस ठाण्याच्या वतिने पीएसआय पालवे,मनोज नवले यांनी चोक बंदोबस्त केला होता.
(चौकट)
खरिप २०२३- २४ हंगामात अतिवृष्टी, सततचा,अवकाळी पाऊस तसेच दुष्काळ परिस्थिती मुळे गंगापुर तालुक्यातील सर्वच पिकांचे नुकसान झाले होते याकडे शेतकरी कृती समिती सोडुन स्थानिक सत्ताधारी व विरोधी लोकप्रतिनिधी लक्ष न दिल्याने पिक विम्या पोटी शेतकर्यांना शेतकर्यांना तुटपुजी रक्कम मिळत आहे…. इंजी.महेशभाई गुजर
चौकट
१ रूपयात पिक विमा भरला गेल्याने शेतकर्यांना पिकविम्याचे महत्त्व राहीले नसल्याने त्याच प्रमाणे २०२३-२४ साली शेतकरी कृती समिती च्या माध्यमातून अतिवृष्टी नुकसान भरपाई, सततच्या पावसामुळे नुकसान भरपाई, अवकाळी पाऊस व २५ टक्के अग्रीम रक्कम मिळाल्याने मोठ्या सदन शेतकर्यानी आपल्या हक्काच्या पैस्याकडे पाठ फिरवली की काय अशी शंका येते. परंतु अल्पभूधारक शेतकर्यांच्या खात्यात काहीतरी पडावे म्हणून शेतकरी कृती समिती पाठपुरावा करत आहे…..राहुल ढोले पाटील