आरोग्य व शिक्षणग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकीय

पुसेसावळी:-विक्रम बाबा फाउंडेशनच्या वतीने पुसेसावळीत उद्या आरोग्य शिबीर.

पत्रकार अक्षय अवघडे खटाव तालुका क्राईम रिपोर्टर:-7499265724

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483

 पत्रकार अक्षय अवघडे खटाव तालुका क्राईम रिपोर्टर

विक्रम बाबा फाउंडेशनच्या वतीने पुसेसावळीत उद्या आरोग्य शिबीर.

पुसेसाळी:- कराडचे कृष्णा विश्व् विदयापीठ व पुसेसावळीचे विक्रम बाबा सोशल फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने सॊमवर दि.11 सप्टेंबर रोजी सकाळी 10 ते 4 या वेळेत दत्त मंगल कार्यालय पुसेसावळी येथे मोफत फिजिओथेरपी शिबिराचे आयोजन. कृष्णा कॉलेज ऑफ फिजिओथेरपी कराड चे प्राचार्य डॉक्टर जी. वरदराजुलू व भाजप चे सातारा जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. अशी माहिती वर्धन ऍग्रो कारखाना संचालक विक्रमशील कदम यांनी दिली. विक्रमबाबा सोशल फाउंडेशन च्या वतीने समाजातील सर्व घटकासाठी विविध उपक्रम राबवले जातात. पुसेसावळी परिसरातील चाळीस गावे, वाडी वस्ती पर्यंत आवश्यक या आरोग्य सुविधा पोचवण्यासाठी सातत्याने विक्रम बाबा फाउंडेशन प्रयत्न करत आहे. डायबिटीस, हाडांची होणारी झीज, बैठी जीवनशैली, या सर्व कारणामुळे सांधेदुखी व संधिवात सारखे त्रास होतात. या शिबिराचे मुख्य उदिष्ट संधिवात बरा करणे आणि होऊ नये म्हणून यासाठी प्रयत्न करणे. पुसेसावळी परिसरातील जनतेला आरोग्य सुविधा मिळव्यात म्हणून कृष्णा कॉलेज ऑफ फिजिओथेरपी. कृष्णा विश्व् विद्यापीठ कराड यांच्या उपस्थितीत शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. पुसेसावळी परिसरातील गरजू रुग्णांनी या संधीचा लाभ घ्यावा असे आवाहन विक्रमशील कदम यांनी केल आहे.

शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button