सातारा:-साताऱ्यात हृदय आणि फुफ्फुस प्रत्यारोपण सुविधा उपलब्ध.
ज्येष्ठ पत्रकार अजित जगताप सातारा

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
ज्येष्ठ पत्रकार अजित जगताप सातारा
RPS STAR NEWS
साताऱ्यात हृदय आणि फुफ्फुस प्रत्यारोपण सुविधा उपलब्ध.
सातारा दि: हृदय आणि फुफुसाच्या अति गंभीर आजाराच्या रुग्णांवर उपचार करण्यासाठी साताऱ्यामध्ये दोन प्रमुख हॉस्पिटलमध्ये पुणे येथील डीपीयू सुपर स्पेशलिटी हॉस्पिटल यांनी सुविधा उपलब्ध केली आहे. यामुळे सातारा व आसपासच्या रुग्णांना त्याचा लाभ होईल अशी माहिती हृदय प्रत्यारोपण व श्वसन विकार तज्ञ डॉ. राहुल केंद्रे व डॉ. संदीप अट्टावार, डॉ. समीर चौहान ,डॉ. संजय साठे, डॉ. अंशुमन गायकवाड यांनी सातारा येथे प्रीती एक्झिक्यूटिव्ह हॉटेल येथे झालेल्या पत्रकार परिषदेत दिली.
या वेळेला यशस्वीरित्या हृदय व फुफ्फुस प्रत्यारोपण झालेल्या रुग्ण प्राध्यापिका श्रीमती सुजाता पवार यांनी सविस्तर माहिती देऊन पत्रकारांच्या ज्ञानात भर घातली. मानवी अवयव दान चळवळ उभी करण्यासाठी याचा फार उपयोग होणार आहे . तीन तासात अवयव प्रत्यारोपण करण्यात यश मिळालेले आहे .यासाठी ८० प्रकारच्या शारीरिक चाचण्या घेण्यात येतात .त्यानंतर रुग्णांना पुणे- मुंबई- हैदराबाद- चेन्नई येथे जावे लागत होते. आता खर्चाची बचत होणार असून रुग्णांना दिलासा मिळणारा असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. अवयव प्रत्यारोपण शस्त्रक्रिया खर्चिक असली तरी पैशापेक्षा जीव महत्त्वाचा आहे असे त्यांनी सांगितले. अवयव दान चळवळीमुळे एक व्यक्ती आपले अवयव दान करून सात रुग्णांचे प्राण वाचवू शकतो.
सध्या भारत देशामध्ये पाच लाख रुग्णांना विविध शारीरिक अवयवाची नितांत गरज आहे . तरी फक्त दोन किंवा तीन टक्के लोक अवयव दान करतात. त्यामुळे अवयव दान चळवळ ही व्यापक झाली पाहिजे. त्यामुळे अनेकांचे जीव वाचवण्यास मदत होणार आहे .सध्या डीपीयू सुपर स्पेशालिस्ट हॉस्पिटलच्या माध्यमातून श्वसन विकार तज्ञ, सर्जन व हृदय आणि फुफ्फुस प्रत्यारोपण सर्जन तसेच डी वाय पाटील विद्यापीठ येथील कुलपती डॉ. पी. डी. पाटील, डॉ. भाग्यश्री पी पाटील, डॉ. यशराज पाटील यांच्यासह डॉ. समीर चौहान ,डॉ. संजय साठे, डॉ. अंशुमन गायकवाड यांचेही मोलाचे मार्गदर्शन लाभत आहे.
तीन तासाच्या कालावधीमध्ये हृदय आणि फुफ्फुस प्रत्यारोपण शस्त्रक्रिया यशस्वी केली जात आहे. वैद्यकीय क्षेत्रात क्रांती झाली असून अपघातानंतर आपल्या लाडक्या व्यक्तीचे अवयव दान केले तर दुसऱ्याचेही प्राण वाचवू शकतो. यासाठी समुपदेशक महत्त्वाचे आहे. विमानातून सुरत येथून तीन तासाने अवयव बसवून प्रत्यारोपण करून एका रुग्णाचे प्राण वाचवण्यात यश मिळाल्यामुळे ज्या रुग्णांनी अवयव दान केले त्यांचे कायम आठवण जिवंत राहत आहे. अशी ही माहिती देण्यात आली.
——————————————–
मुलांसाठी महत्त्वाची चौकट—-
दरम्यान,हृदय व फुफ्फुस प्रत्यारोपण करणाऱ्या रुग्णांनी याबाबत अवयव दान करणाऱ्या व्यक्तींच्या नातेवाईक व हितचिंतक यांच्याशी संपर्क साधावा व प्रत्यारोपण शस्त्रक्रियेबाबत होणाऱ्या संपूर्ण खर्चाची माहिती घेऊनच रुग्णांच्या प्रत्यारोपण शस्त्रक्रिये बाबत निर्णय घ्यावा. असं सातारा जिल्ह्यातील काही वैद्यकीय क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्तींनी सांगितले.
—————————————–
फोटो सातारा येथील पत्रकार परिषदेत हृदय व फुफ्फुस प्रत्यारोपण बाबत माहिती देताना मान्यवर (छाया- निनाद जगताप, सातारा)