सातारा:-श्री पवारसाहेबांनी उडवलेली कॉलर हा संदेश-यशवंत भाऊ भोसले यांचा दावा.
ज्येष्ठ पत्रकार अजित जगताप सातारा

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
ज्येष्ठ पत्रकार अजित जगताप सातारा
RPS STAR NEWS
श्री पवारसाहेबांनी उडवलेली कॉलर हा संदेश-यशवंत भाऊ भोसले यांचा दावा.
सातारा दि: सातारा मध्ये झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये ज्येष्ठ नेते शरदचंद्र पवार साहेब यांनी पत्रकारांच्या प्रश्नाला उत्तर देताना श्री. छ. खा. उदयनराजे भोसले स्टाईल कॉलर उडवून दाखवली.ही स्टाईल म्हणजे श्री. छ. खा. उदयनराजे भोसले यांना निवडून देण्याचे संदेश असल्याचा दावा राष्ट्रीय श्रमिक आघाडीचे संस्थापक अध्यक्ष यशवंत भाऊ भोसले यांनी सातारा येथे केला. सातारा येथील झालेल्या भरगच्च पत्रकार परिषदेत ते बोलत होते. श्रमिक, शेतकरी, महिला, युवकांचे कायदे हे संसदेत केले जातात. हे कायदे टिकवण्यासाठी उच्च पदस्थ खासदार उदयनराजे भोसले यांच्या सारखा खासदार असावा असे वाटते.
सध्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली दहा वर्षात दळणवळणात प्रगती झालेली आहे. मुंबईला जाण्यासाठी वेळ लागत होता. आता पाच तासात मुंबईला जाता येते. देशभरात अटल सेतू व कन्याकुमारी ते हिमाचल प्रदेश रस्ते, औद्योगीकरण करून रोजगार मिळत आहे. असे त्यांनी सांगितले राष्ट्रीय श्रमिक आघाडीच्या १७७ औद्योगिक संघटनेत काम करत आहे. स्थिर सरकार असेल तर विकास कामांमध्ये गती येते. सातारा येथे छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले हे उमेदवार असल्यामुळे संपूर्ण जगाचे लक्ष लागलेले आहे. इंग्रजी भाषेवर प्रभुत्व असल्यामुळे त्यांनी संसदेत चांगले काम करून दाखवण्यासाठी त्यांना निवडून द्या. असे स्पष्ट केले. सातारचा मान सन्मान राखण्यासाठी पवार साहेबांनी जो संदेश दिलाय तो खूप महत्त्वाचा आहे. आ. शशिकांत शिंदे यांनी आतापर्यंत श्री. छ. खा. उदयनराजे भोसले यांना निवडून देण्यासाठी सातारचा मावळा म्हणून परिश्रम घेतले होते. राजकीय निर्णयानुसार जर आ. शशिकांत शिंदे यांना लोकसभेसाठी उमेदवारी मिळाली नसती तर त्यांनी निश्चितच श्री.छ खा. उदयनराजे भोसले यांच्या पाठीशी ठाम राहिले असते. असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. श्री छ खा उदयनराजे भोसले यांचा मागील पोट निवडणुकीमध्ये झालेला पराभव जगाला आवडला नाही. त्यामुळे ते आता प्रचंड मताने निवडून येतील असे त्यांनी शेवटी सांगितले. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजित दादा पवार यांनी सातारा लोकसभा मतदारसंघांमध्ये महायुतीचे उमेदवार म्हणून श्रीमंत छत्रपती खासदार उदयनराजे भोसले यांना सहमतीने व जनतेच्या मनातील कोनासा पाहून उमेदवारी दिली आहे. त्याबद्दल त्यांचे मनःपूर्वक आभार हे मानण्यात आले.