श्रीरामपूर:-(रामपूर):-दारूबंदीसाठी रामपूर येथील महिला आक्रमक – ग्रामसभेचा ठराव करत दारू उत्पादन शुल्क अधिकाऱ्यांना निवेदन.
पत्रकार देविदास गायकवाड श्रीरामपूर तालुका संघटक

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
पत्रकार देविदास गायकवाड श्रीरामपूर तालुका संघटक
RPS STAR NEWS
दारूबंदीसाठी रामपूर येथील महिला आक्रमक – ग्रामसभेचा ठराव करत दारू उत्पादन शुल्क अधिकाऱ्यांना निवेदन.
नाऊर ( RPS स्टार न्यूज ) ः श्रीरामपूर तालुक्यातील रामपूर (कोकरे ) येथील महिलांनी दारूविषयी आक्रमक धोरण घेत विशेष ग्रामसभेद्वारे दारूबंदीचा ठराव संमत करत थेट जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांचे सह दारू उत्पादन शुल्क चे अधिकारी व जिल्हाधिकारी यांच्या कार्यालयात जाऊन प्रत्यक्ष निवेदन देण्यात आले.
महिला तसेच विशेष ग्रामसभेत झालेल्या ठरावानुसार गावामध्ये मोठ्या प्रमाणात अवैध दारूचे व्यवसाय असून त्यामुळे अनेक तरुण पिढी वश मध्ये होत चालले आहे विशेष म्हणजे १४ ते २१ या वयातील तरुण दारुच्या जास्तच आहारी गेले ले आहेत प्रत्येक कुटुंबात वाद विवाद होत असून कुटुंबातील बालकावर देखील त्याचा विपरीत परिणाम होत आहे लहान मुलांना देखील दारूचे आकर्षण झाल्याने तरुण पिढी बेकायदेशीर मार्गाला लागण्याची शक्यता आहे त्यामुळे आपल्या परिसरातील दारू विक्री तत्पर बंद करण्याची मागणी ग्रामसभेद्वारे करण्यात आली.तसेच गावातील दारूबंदी अवदे व्यवसाय त्वरित बंधने केल्यास जिल्हाधिकारी कार्यालय अहमदनगर कार्यालयासमोर आमरण उपोषण करण्याचा इशाराही महिलांनी या ठराव द्वारे दिला आहे.
सुमारे ८०ते ९०महिलांनी जिल्हाधिकारी कार्यालय जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालय तसेच दारू उत्पादन शुल्क विभाग नगर यांना प्रत्यक्ष भेटून निवेदन देण्यात आलेले आहे.तसेच सदर महिलांनी दुसऱ्या दिवशी गावातील अवैध दारू व्यवसाय करणाऱ्या सर्व दुकानदारांकडे जाऊन दारू बंदच करण्याची मागणी करत कुंटूबामध्ये होत असलेल्या वादासह तरुण पिढीवर होणाऱ्या दुष्परिणामाची कल्पना दिली.
याप्रसंगी सरपंच नितीन शिंदे ग्रामपंचायत सदस्य अमित कोकरे, दीपक खेमनर,बाळू उपळकर यांच्यासह उषाबाई भडांगे, आशाबाई भडांगे, रेखा जाधव, आशाबाई उपळकर,अनिता धनवटे,नंदा भडांगे , ग्रा.पं. सदस्य रंजना माळी, ग्रा.पं.सदस्य रेखा कुसळकर, इंद्राबाई उपळकर, अश्विनी उपळकर, कोमल धनवटे, जया खैरे, विमल धनवटे , सुनीता धनवटे ,जनाबाई धनवटे,स्वाती कोळेकर,मुक्ताबाई उपळकर , विठाबाई पांढरे,सुमन गुंजाळ, रूपाली धनवटे आदीसह सुमारे ८० ते ९०महिला उपस्थित होत्या.