वाई:-मयुर गवते राजपत्रित संवर्गपदी.
पत्रकार सारिका गवते वाई तालुका महिला अध्यक्ष

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483

मयुर गवते राजपत्रित संवर्गपदी.

वाई दि.१:- महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या राज्यसेवा परीक्षा 2024 च्या निकालात ओझर्डे ( वाई ) येथील मयूर संगीता प्रमोद गवते यांनी झळाळते यश संपादन करत गटविकास अधिकारी (BDO) वर्ग – १ या पदावर निवड झाली आहे. त्यांच्या या उल्लेखनीय कामगिरीमुळे गावात आणि परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
त्यांचे प्राथमिक शिक्षण इयत्ता 1 ली ४थी जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळा ओझर्डे व माध्यमिक शिक्षण पतितपावन विद्यामंदिर, ओझर्डे येथे झाले. पुढील उच्च माध्यमिक शिक्षण त्यांनी राजेंद्र विद्यालय खंडाळा येथे पूर्ण केले. कृषी महाविद्यालय, पुणे येथून बी.एस्सी. (Agriculture) पदवी प्राप्त केली.
मयूर यांची घरची परिस्थिती सक्षम असून कुटुंबीयांनी अभ्यासासाठी आणि तयारीसाठी संपूर्ण पाठींबा दिला.त्यांचे पिताजी सेवानिवृत्त एस टी कर्मचारी आहेत.त्यांनी 2021 पासून MPSC ची तयारी सुरू केली असून हा त्यांचा तिसरा प्रयत्न होता आणि यश त्यांच्या पावलांवर आले.
त्यांच्या यशाबद्दल ओझर्डे ग्रामस्थ, कुटुंबीय, नातेवाईक,शिक्षक आणि मित्रपरिवाराकडून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. पुढील शासकीय सेवेमध्ये ते ग्रामीण विकासात मोलाची भर घालतील, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.




