मावळ:-वसुंधरेचे रक्षण आणि पर्यावरणाचे संरक्षण करणारे विद्यार्थी घडावेत – सुधीर मुनगंटीवार.
प्रतिनिधी धर्मेंद्र ठाकर मावळ:-9960044802

मुख्य संपादक प्रल्हाद चव्हाण:-8208717483.
वसुंधरेचे रक्षण आणि पर्यावरणाचे संरक्षण करणारे विद्यार्थी घडावेत – सुधीर मुनगंटीवार.
परिसरात कृषी महाविद्यालयाची अत्यंत गरज – आमदार सुनील शेळके.
शिक्षण संकुलातून वसुंधरेचे रक्षण आणि पर्यावरणाचे संरक्षण करणारे विद्यार्थी घडावेत ! असे प्रतिपादन महाराष्ट्र राज्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले.पवनानगर येथील पवना शिक्षण संकुलाच्या वतीने आयोजित वृक्षारोपण कार्यक्रमात ते बोलत होते.
आज दि.२१ जानेवारी रोजी पवनानगर येथील पवना शिक्षण संकुलाच्या वतीने वृक्ष रोपण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून महाराष्ट्र राज्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार, तसेच पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणचे आयुक्त राहुल महिवाल, उप-वनसंरक्षक राहुल पाटील, पवना प्रॉपर्टी असोसियशन चे अध्यक्ष पद्मभूषण रजनीकांत श्रॉफ, सुमित चौक्सी, आमदार सुनील शेळके, नायब तहशिलदार रावसाहेब चाटे, अलका धानिवले, कल्याणी ठाकर, पवना शिक्षण संकुलाचे सचिव संतोष खांडगे, सुनील भोंगाडे,प्राचार्य भाऊसाहेब आगळमे, नीला केसकर, भारत काळे, गणेश ठोंबरे, प्राथमिक विभागाचे प्रमुख गणेश साठे आणि इतर सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी आणि परिसराती पालक बहुसंखेने उपस्थित होते.
यावेळी बोलतना ते म्हणाले कि विद्यार्थी हे देशाचे भविष्य आहेत त्यांनी देशाच्या स्वप्न पूर्तीसाठी प्रयत्न करावेत विद्यार्थ्यांनी जीवनात यश प्राप्तीसाठी प्रचंड मेहनत करावी आणि त्याच बरोबर आई- वडिलांची सेवा करावी हे करत असताना पर्यावरण आणि वसुंधरेचे संरक्षण करण्यासाठी विद्यार्थ्यांनी आपले योगदान द्यावे. शिक्षकांनी विद्यार्थ्यांना संस्कारक्षम शिक्षण देणे गरजेचे असल्याचे हि त्यांनी सांगितले. तसेच जीवनात धनापेक्षा वन महत्वाचे आरोग्याच्या दृष्ठीने वृक्ष आपल्याला अनेक पटीने ऑक्सिजन देतात उत्तम आरोग्यासाठी झाडे लावा असे आवाहन देखील केले.
यावेळी मावळ चे आमदार सुनील शेळके यांनी मावळ परिसार हा डोंगरखोऱ्याचा, निसर्गानी नटलेला परिसर आहे. परिसरात कृषी महाविद्यालयाची अत्यंत गरज असून ग्रामीण भागात रस्ते,शिक्षण,आरोग्य आणि विद्यार्थ्यांना चांगले शिक्षण मिळणे यासाठी अधिकचे काम करणे गरजेचे आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थी अनेक अडचणींवर मात करून आपले शिक्षण घेत असतात या विद्यार्थ्यांना मदत करणे गरजेचे आहे असे सांगितले
पद्मभूषण रजनीकांत श्रॉफ म्हणाले कि पवना धरणग्रस्त परिसरातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक सुविधा उपलब्ध करून देण्यात येत असून या वर्षी ५० हजार वृक्ष लागवडीचा देखील संकल्प केला असल्याचे म्हणाले पवना शिक्षण संकुलात विद्यार्थ्यांसाठी ५० स्वच्छतागृह बांधण्याचे काम सुरु असल्याचे हि म्हणाले
संस्थेची व पवना शिक्षण संकुलाची माहिती देऊन कार्यक्रमाचे प्रास्ताविक संस्थेचे सचिव संतोष खांडगे यांनी केले, सूत्र संचालन रोशनी मराडे व सुवर्णा काळडोके यांनी केले तर आभार शाळेचे प्राचार्य भाऊसाहेब आगळमे यांनी केले



