आरोग्य व शिक्षणताज्या घडामोडीमहाराष्ट्र

साताऱ्यातील शिवतीर्थावरील दगडी सुशोभीकरणाचे काम प्रगतीपथावर… 

ज्येष्ठ पत्रकार अजित जगताप सातारा 

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483

 ज्येष्ठ पत्रकार अजित जगताप सातारा

RPS STAR NEWS

साताऱ्यातील शिवतीर्थावरील दगडी सुशोभीकरणाचे काम प्रगतीपथावर…

सातारा दि: छत्रपती शिवाजी महाराजांची राजधानी असलेल्या सातारा नगरीत ६२ वर्षांपूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारण्यात आला होता. आता या शिवतीर्थ परिसरातील पुतळ्याभोवती दगडी बांधकाम व सुशोभीकरणाचे काम प्रगतीपथावर आहे . सातारा नगरीच्या वैभवात चांगलीच भर पडणार आहे. याबाबत माहिती अशी की, सातारा शहरातील पोवई नाका तथा शिवतीर्थ या ठिकाणी सोबत छत्रपती शिवाजी महाराजांचा तोफेसह महाराष्ट्रातील एकमेव पुतळा आहे. या पुतळ्या भोवती बुरुज, मेघडंबरी , दगडी तटबंदी, छोटासा बगीचा, कारंजा व इतर दगडी बांधकाम करून त्याचे सौंदर्य वाढवण्याच्या दृष्टीने प्रयत्न केले जात आहेत.
या शिवतीर्थावर दोन्ही बाजूने कमानी प्रवेशद्वार उभारण्यात आलेलेआहेत . त्याचे सुशोभीकरण वेगाने सुरू असून कारागीर चांगल्या पद्धतीने काम करत आहेत. या ठिकाणी विद्युत रोषणाई करून या सौंदर्यात भर टाकली जाणार आहे.
सदर कामासाठी यापूर्वीच सहा कोटी रुपये मंजूर करण्यात आलेले आहेत . अहमद नगर येथील खाणीतून दगड आणून कोरीव काम साताऱ्यात केले जात आहे. शिवजयंती दिनी १९ फेब्रुवारी रोजी शंभर फुटी भगवा ध्वज उभारण्यात आला होता. आता त्यानंतर सुशोभीकरणाचे काम वेगाने सुरू असून सातारचे उपनगराध्यक्ष मनोज शेंडे, मुख्याधिकारी अभिजीत बापट, शहर अभियंता दिलीप चिंद्रे, अभियंता सुधीर चव्हाण यांच्यासह ४० ते ५० कारागीर परिश्रम घेत आहेत.
सातारचे खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले व आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या प्रयत्नातून या सुशोभीकरणाचे काम प्रगतीपथावर आहे. शिवतीर्थ परिसरामध्ये कोणत्याही प्रकारचे अतिक्रमण होऊ नये. तसेच शिवतीर्थ परिसरातील पवित्र राखावे यासाठी या ठिकाणी सुरक्षा रक्षक तसेच सीसीटीव्ही कॅमेरे बसवावेत. अशी मागणी छत्रपती शिवाजी महाराज प्रेमी यांनी केलेली आहे. महाराष्ट्राचे शेतकी मंत्री दौलतराव तथा बाळासाहेब देसाई यांनी २६ एप्रिल १९६२ रोजी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे उभारणीचे उद्घाघाटन केले होते. आज त्यांचे नातू सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्याही प्रयत्नातून या शिवतीर्थावरील सुशोभीकरणाचे काम सुरू आहे. याचे कौतुक होत आहे.
——————————-&-&———

ACLS TIMES” YOUTUBE चॅनेल ला LIKE SUBSCRIBE आणि COMMENT करा. 🙏

ACLS इंटरनॅशनल प्रेस रिपोर्टर असोसिएशन

शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button