महाबळेश्वर:-(सातारा)-झाडाणी प्रकरणी तक्रारदाराने मांडले मत तर इतरांना मागितली मुदत …
ज्येष्ठ पत्रकार अजित जगताप सातारा

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
ज्येष्ठ पत्रकार अजित जगताप सातारा
RPS STAR NEWS
झाडाणी प्रकरणी तक्रारदाराने मांडले मत तर इतरांना मागितली मुदत …
सातारा दि: संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागलेल्या झाडाणी ता. महाबळेश्वर येथील जमीन खरेदी प्रकरणी इतरांवर आरोप करण्यात आले होते .याबाबत मंगळवार दिनांक ११ जून रोजी अप्पर जिल्हाधिकारी श्री जीवन गलांडे यांच्यासमोर सकाळी अकरा वाजता सुनावणी झाली. या वेळेला तक्रारदार झाडाणी ग्रामस्थ व सामाजिक कार्यकर्ते श्री सुशांत मोरे यांनी आपले म्हणणे मांडले तर इतरांबाबत ऍड .उदय धनावडे यांनी पुढील सुनावणीच्या तारखेसाठी मुदत मागितली असल्याची माहिती पत्रकारांशी बोलताना दिली.
आज झाडाणी जमीन खरेदी प्रकरणी सातारा अप्पर जिल्हाधिकारी जीवन गलांडे यांनी सुनावणी ठेवली होती. या सुनावणीच्या वेळेला तक्रारदार व सामाजिक कार्यकर्ते सुशांत मोरे यांच्यासह झाडाणी ग्रामस्थ मानाजी तानाजी मोरे, रुमाजी अमृता मोरे यांच्यासह स्थानिक ग्रामस्थ उपस्थित होते. सकाळी अकरा वाजता अप्पर जिल्हाधिकारी यांच्या दालनामध्ये सुनावणीसाठी वकिलानमार्फत म्हणणे मांडण्यासाठी दोन्ही बाजूचे वकील महोदय दालनात गेले होते.
संपूर्ण महाराष्ट्रात या जमीन खरेदी बाबत प्रसारमाध्यमाने चांगलाच आवाज उठवला होता. जमीन खरेदी प्रकरणी गुजरात राज्याचे मुख्य जी.एस.टी. आयुक्त चंद्रकांत वळवी , अनिल वसावे, बोंगिरवार यांना नोटीस देण्यात आली होती त्यासाठी त्यांच्या वकिलामार्फत म्हणजे मांडावे अशी संधी दिली होती.
अतिदुर्ग व मागास भागातील जमीन कवडीमोल भावाने विकत घेतली होती. या गोष्टीला वीस वर्षे झाली असली तरी सह्याद्री वाचवा मोहिमांतर्गत माहिती अधिकार कायदे अंतर्गत माहिती घेतली असता झाडाणी येथील ६४० एकर पडीक जमीन खरेदी केल्याची बाब उघडकीस आली आहे.
याबाबत मोठा गदारोळ झाल्यानंतर सातारा जिल्हाधिकारी यांनी सदरच्या खरेदी व अनाधिकृत बांधकामाबाबत नोटीस काढली. आणि या नोटिशीला उत्तर देण्यासाठी सुनावणी ठेवली होती. आज अपर जिल्हाधिकारी यांच्या दालनात सुशांत मोरे व त्यांचे वकील ऍड अशोक जाधव ऍड .त्रूणाल टोणपे तसेच वळवी, वासवे व बोंगीरवार या तिघांच्या वतीने ऍड .उदय धनावडे हे बाजू मांडण्यासाठी आले होते. परंतु त्यांनी याबाबत आवश्यक पुरावे व कागदपत्र आणले नाहीत. उलट त्यांनी पुढील तारीख घेऊन बाजू मांडण्याची विनंती केली.
तक्रारदारांनी सदरच्या झाडाणी जमीन खरेदी बाबत माहितीच्या अधिकारात माहिती गोळा केली. आंदोलन -निदर्शने केली. आवाज उठवला. स्थानिक ग्रामस्थांचा या लढ्याला पाठिंबा मिळाला. ही एक बाजू तर दुसऱ्या बाजूला फक्त वकील आले व पुढील तारीख द्या एवढेच सांगून निघून गेल्यामुळे या सर्व प्रकरणाबाबत उत्सुकता अधिक ताणली गेलेली आहे. सदर सुनावणीचे प्रकरण हे सातारा जिल्हाधिकारी कार्यालयात होत असून याबाबत नोटीस जरी पाठवले असली तरी सूचनाफलकावर या झाडाणी बाबत कुठलीही सूचना प्रसिद्ध केली नव्हती. मात्र त्याबाबत मोठ्या आवाजात पुकारण्यात आले. इतरांना सुनावणीची वेळ दुपारी असली तरी ही सुनावणी सकाळी घेतल्यामुळे या ठिकाणी फारशी गर्दी नव्हती. दरम्यान, सातारा जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी हे अचानक सुट्टीवर गेल्यामुळे त्यांचा तात्पुरता पदभार अप्पर जिल्हाधिकारी यांच्याकडे देण्यात आला आहे.