ताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकीय

सातारा:-श्री छ.खा.उदयनराजे भोसले यांच्या विजयाचे अदृश्य हात.

ज्येष्ठ पत्रकार अजित जगताप सातारा 

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483

 ज्येष्ठ पत्रकार अजित जगताप सातारा

RPS STAR NEWS

श्री छ.खा.उदयनराजे भोसले यांच्या विजयाचे अदृश्य हात.

सातारा दि: सातारा लोकसभा मतदार संघाच्या निवडणुकीत महायुतीचे भाजप उमेदवार श्री. छ. खा. उदयनराजे भोसले यांच्या विजयासाठी अदृश्य हात झटत होते. पण त्यापैकी काही चेहरे मिरवणूक किंवा गुलालउधळीत दिसून येत नव्हते. त्यांचे आता सर्वत्र कौतुक होत आहे. गेली सहा महिन्यापासून श्री. छ. खा. उदयनराजे भोसले यांनी सातारा लोकसभेची निवडणूक लढवावी यासाठी हे पाच अदृश्य चेहरे प्रामाणिकपणाने झटत होते .सुरुवातीला राजकीय टीका सहन करून त्यांनी आडाखे बांधले. त्यानंतर सूक्ष्म पद्धतीने नियोजन करून कुठल्याही घटक पक्षाला नाराज न करता सर्वांना सोबत घेण्यासाठी मायक्रो प्लानिंग केले. विशेषतः सोशल मीडियाचा खुबीने वापर करून सर्व मतदारांपर्यंत श्री. छ. खा. भोसले यांची भूमिका व प्रतिभा पोहोचवली. त्यामुळेच खऱ्या अर्थाने या निवडणुकीत विजयाचा मार्ग सापडला. काही राजकीय डावपेच करताना शत्रूच्या गोठ्यातही शिरून गुप्तहेर पद्धतीने माहिती काढली जाते. काही वेळेला मैत्री असले तरी खूप कठीण निर्णय घ्यावे लागतात.
या सर्व गोष्टींचा नियोजन पद्धतीने कामगिरी करून यश मिळवलेले आहे. तुतारी फुंकणारा माणूस आणि नुसती तुतारी मागील माणूस दिसू नये. अशी रचना आखली होती. त्यामध्ये सुद्धा यश मिळालेले आहे.
श्री. छ. खा. उदयनराजे भोसले हे ज्यावेळी पिछाडीवर होते. त्यावेळेला प्रचारात कुठेही न दिसणारे गायब होते पण जेव्हा विजयी गुलाल दिसू लागला त्यावेळेला काहीजण रस्त्यावर उतरले काहींना तर आयती संधी चालून आल्यामुळे त्यांनी सुद्धा मग गर्दीत शिरून जय हो चा नारा दिला. निवडणुकीच्या काळात ज्यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला जात होता. ते भेटले नाहीत. पण, श्री छ खा भोसले महाराज साहेब विजय झाले हे समजताच विजयी मिरवणुकीमध्ये गुलाल उधळण्यासाठी काही महाभाग पुढे होते. ज्यांच्यामुळे मतदार नाराजी व्यक्त करत होते. अशी काही मंडळी सुद्धा या मिरवणुकीत सामील होऊन आपल्यामुळेच श्री. छ. खा. उदयनराजे भोसले निवडून आले आहे. अशा अविर्भावात नाचून गुलाल उधळत होते. हा मानवी स्वभावाचा भाग असला तरी दुसऱ्या बाजूला अगदी श्री. छ. खा. भोसले यांच्यासोबत सावलीप्रमाणे वावरणारे त्यांचे सहकारी सुनील काटकर, चंद्रकांत पाटील, काका धुमाळ, विनीत पाटील, संग्राम बर्गे, दत्ता बनकर, जितेंद्र खानविलकर ,अशोक घोरपडे, प्रवीण धसके, मनोज शेंडे व संदीप शिंदे,पंकज चव्हाण, बाळासाहेब ननावरे याचबरोबर सातारा जिल्ह्यातील मंत्री महोदय, महायुतीचे आमदार- पदाधिकारी, घटक पक्षाचे अध्यक्ष व पदाधिकारी, कार्यकर्ते, प्रचारक असे अनेक सहकारी व संपूर्ण प्रचार यंत्रणेमध्ये बारकाईने नजर ठेवून असणारे सर्वच मंडळी निवडणुकीत विजयी भव ऐकण्यासाठी आतुर झाले होते. आता आश्वासन पूर्तीसाठी त्यांची जबाबदारी वाढलेली आहे. राजकारण करताना दिलेले आश्वासन आता पाळावे लागणार आहेत. त्यासाठी आता काही अदृश्य हात कामाला लागले असून त्यांच्या प्रयत्नामुळेच श्रीमंत छत्रपती खासदार उदयनराजे भोसले यांना देशात खूप मोठी मजल मारण्याची संधी मिळाली आहे हे मात्र खरे. अशा अदृश्य चेहऱ्याचे अभिनंदन करण्यासाठी श्री. छ. खा. उदयनराजे भोसले हे सुद्धा अतुर झालेले आहेत.
———————————————

फोटो –जलमंदिर येथील दरबार हॉलमध्ये अशा अदृश्य हात हाती घेऊन विजयाची वाटचाल करणारे श्रीमंत छत्रपती खासदार उदयनराजे भोसले (छाया- अजित जगताप, सातारा)

ACLS TIMES” YOUTUBE चॅनेल ला LIKE SUBSCRIBE आणि COMMENT करा. 🙏

ACLS इंटरनॅशनल प्रेस रिपोर्टर असोसिएशन

शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button