कराड:-वेणूताई चव्हाण कॉलेज, कराडच्या खेळाडूंची राज्यस्तरीय शालेय क्रीडा स्पर्धेत कामगिरी.
प्रतिनिधी प्रा.संतोष बोंगाळे कराड:-9923900840

मुख्य संपादक प्रल्हाद चव्हाण:-8208717483
वेणूताई चव्हाण कॉलेज, कराडच्या खेळाडूंची राज्यस्तरीय
शालेय क्रीडा स्पर्धेत कामगिरी.
कराड: (प्रतिनिधी) येथील वेणूताई चव्हाण महाविद्यालयाच्या खेळाडूंनी बालेवाडी (पुणे) येथे झालेल्या राज्यस्तरीय शालेय मैदानी क्रीडा स्पर्धेत उज्ज्वल यश संपादन केले.
त्यामध्ये कु. सोनवणे राजनंदिनी तुकाराम (इ.12 वी कला) हिने गोळाफेक या क्रीडा प्रकारात (12.97 मी.) 19 वर्षाखालील मुली गटात प्रथम क्रमांक मिळविला तसेच कु. शेवाळे निकीता हिम्मत (इ.12 वी कला) हिने थाळी फेक या क्रीडा प्रकारात (36.46मी.) 19 वर्षाखालील मुली गटात प्रथम क्रमांक मिळविला. 17 वर्षाखालील मुले गटात श्री. जाधव शिवराज राजेश (इ.11 वी कला) याने हातोडा फेक (46.97मी.) या क्रीडा प्रकारात प्रथम क्रमांक व गोळा फेक (13.05मी.) या क्रीडा प्रकारात तृतीय क्रमांक मिळविला. कु. थोरवडे दिक्षा मानसिंग (इ.11वी कला) हिने 17 वर्षाखालील मुली गटात हातोडा फेक (45.41मी.) या क्रीडा प्रकारात प्रथम क्रमांक मिळविला.
या सर्व खेळाडूंनी उल्लेखनीय कामगिरी करून उज्ज्वल यश संपादन केल्यामुळे मा. श्री. जयंत (काका) पांडूरंग पाटील (अध्यक्ष श्री.शिवाजी शिक्षण संस्था, विद्यानगर कराडचे उच्च शिक्षणमंडळ, विद्यानगर, कराड), मा. श्री. अल्ताफहुसेन मुल्ला (जनरल सेक्रेटरी, श्री. शिवाजी शिक्षण संस्था, विद्यानगर, कराडचे उच्च शिक्षण मंडळ, विद्यानगर, कराड), मा. श्री. अरूण (काका) पांडूरंग पाटील (सदस्य श्री. शिवाजी शिक्षण संस्था, विद्यानगर, कराडचे उच्च शिक्षण मंडळ, विद्यानगर, कराड तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एल. जी. जाधव यांनी सर्व खेळाडूंचे हार्दिक अभिनंदन केले व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. कनिष्ठ विभागाचे उपप्राचार्य मा. श्री. कांबळे सर, यशवंतराव चव्हाण कॉलेज ऑफ सायन्स, कराडचे प्राचार्य मा. डॉ. एस. बी. केंगार, शारीरिक शिक्षण विभागाचे डॉ. एम. ए. कदमपाटील, प्रा. व्ही. एस. डाफळे, श्रीमती सुनिता जाधव, पर्यवेक्षक , प्राध्यापक, प्रशासकीय सेवक, विद्यार्थी व विद्यार्थिनी यावेळी उपस्थित होते.